Maharashtra Budget 2026: अजितदादांच्या निधनानंतर पहिलाच अर्थसंकल्प! अजितदादांचे भव्य स्मारक उभारणार; फडणवीसांकडून घोषणा
Sarkarnama March 06, 2026 06:45 PM

Maharashtra Budget 2026 LIVE Updates उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पहिलाच अर्थसंकल्प आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. राज्याच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्र्यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करणारे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.

2026-2027चा हा यंदाचा अर्थसंकल्प अजित पवार यांना समर्पित करण्यात आला. अर्थसंकल्प मांडताना फडणवीस यांनी अजितदादांची आठवण काढली. अजितदादा आणि अर्थसंकल्प हे नातं दृढ झालं होतं. 'काम करणारा माणूस' अशी त्यांची ओळख होती.

त्यांच्या व्यक्तीमत्त्वाला साजेसे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अजितदादांच्या नावे गतिमान नागरी सन्मान हा पुरस्कार सुरू करण्यात येईल. हा अर्थसंकल्प अजितदादांना समर्पित करतो, असे फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भषणादरम्यान दिवंगत उपमुख्यमंत्री आणि माजी अर्थमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. अजितदादांची आठवण काढताना मुख्यमंत्री भावुक झाले. यावेळी त्यांनी अजितदादांनी केलेल्या योगदानाची आठवण करून दिली. त्यांनी अजित पवार यांचे भव्य स्मारक बांधले जाईल आणि त्यांच्या नावाने गतीमान नागरी सेवा पुरस्कार दिला जाईल अशी मोठी घोषणा केली. यावेळी विधानसभेमध्ये 'अजितदादा अमर रहे अमर रहे'च्या घोषणा देण्यात आल्या.

हा केवळ जमाखर्च नाही तर विकसीत महाराष्ट्राचा लेखाजोखा आहे. यावेळी फडणवीसांनी राज्यातील महामानवांना अभिवादन केले. संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र एकत्र करून, संत गाडगेबाबा ग्राम समृद्धी योजना राबविण्यात येईल. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने अभियान राबविण्यात येणार असल्याची त्यांनी घोषणा केली.

या अर्थसंकल्पात मुंबईसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई ३.० आणि मुंबई ४ ची घोषणा करण्यात आली आहे.मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात मुंबई ३.० आणि चौथी मुंबई विकसित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.