- rat५p१२.jpg-
२६O२८८४३
डॉ. शैलेश शिंदेदेसाई
-----
राष्ट्रीय काजू परिषदेत राजापूरचा मान
डॉ. शिंदेदेसाई करणार, शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ६ ः भारताला काजू अन् कोको उत्पादनामध्ये जगातील प्रमुख देश बनविण्याच्या उद्देशाने विचारविनिमय करण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयातर्फे राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेसाठी राजापूरचे सुपुत्र डॉ. शैलेश शिंदेदेसाई यांची प्रगतशील काजू उत्पादक आणि प्रक्रियाधारक शेतकरी म्हणून निवड झाली असून ते या परिषदेमध्ये महाराष्ट्रासह शेतकऱ्यांचे नेतृत्व करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या परिषदेला देशभरातील काजू-कोको पिक घेणारे प्रगतशील शेतकरी, शास्त्रज्ञ, अधिकारी सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांसह अन्य भागामध्ये आणि राज्याच्या सीमेवरील गोवा राज्यासह देशभरामध्ये मोठ्याप्रमाणात काजू उत्पादन घेतले जात आहे. या पिकाच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात रोजगार निर्मिती होताना कोट्यवधी रूपयांची उलाढाल होते. शेतकऱ्यांसह देशाला उत्पन्न मिळवून देणारे हे पीक विविध कारणांमुळे अडचणीत येऊन त्यातून होणारे अर्थकारण बिघडले आहे. त्यामुळे काजू-कोको उत्पादनासह पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविणे, स्थानिक पातळीवर प्रक्रीया उद्योग उभारणे आदींवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय स्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले.
---------
कोट
काजू-कोको उत्पादनासह पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविणे, स्थानिक पातळीवर प्रक्रिया उद्योग उभारणे आदींवर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयातर्फे राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध समस्या, कीड-रोग प्रादुर्भावावर संशोधन करून उपाययोजना करणे, प्रक्रिया उद्योग निर्मिती, शेतकऱ्यांची अनुदान समस्या सोडविणे यासंबंधी चर्चा करून काजू-कोको पिकाच्या माध्यमातून सधन करण्याला प्राधान्य देण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे.
- डॉ. शैलेश शिंदेदेसाई, राजापूर