पिंपरी, ता. ५ ः महापालिका विषय समिती सदस्यांची निवड करताना सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जुन्या-नव्या सदस्यांना पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा मतदारसंघनिहाय संधी देऊन समतोल समीकरण साधल्याचे दिसत आहे. प्रत्येक समिती अध्यक्षांची निवड होऊन कारभारही सुरू झाला आहे.
महापालिकेत स्थायी समितीसह विधी, शहर सुधारणा, शिक्षण, महिला व बालकल्याण आणि क्रीडा-कला- साहित्य- संस्कृती अशा विषय समित्या आहेत. स्थायी समितीत १६ सदस्य असून विषय समित्यांमध्ये प्रत्येकी नऊ सदस्य आहेत. सभागृहातील संख्याबळानुसार स्थायीमध्ये भाजपला ११, राष्ट्रवादीला चार आणि शिवसेनेला एक सदस्यपद मिळाले आहे. विषय समित्यांमधून मात्र शिवसेनेचा पत्ता कट झाला आहे. प्रत्येक विषय समितीत भाजपचे प्रत्येकी सहा आणि राष्ट्रवादीचे तीन सदस्य आहेत. ही सदस्य निवड करताना दोन्ही पक्षांनी जुन्या-नव्यांना संधी देऊन बेरजेचे राजकारण केलेले दिसते. प्रत्येक समितीचे अध्यक्ष निवडतानाही हेच समीकरण अवलंबिलेले दिसते. सोमवारी (ता. २) सर्व विषय समित्यांच्या अध्यक्षांची निवड झाली असून त्यांनी कारभार सुरू केला आहे. त्यांच्या पाक्षिक सभा गुरुवारपासून (ता. ५) सुरू झाल्या. गुरुवारी शिक्षण समितीची पहिली सभा अपेक्षित होती. मात्र, कार्यपत्रिका नसल्यामुळे बैठक होऊ शकली नाही. शुक्रवारी (ता. ६) विधी समितीची बैठक अपेक्षित आहे
विषय समित्यांमधील मतदारसंघनिहाय सदस्य
समिती / पिंपरी / चिंचवड / भोसरी
विधी / वर्षा जगताप / ज्ञानेश्वर जगताप, विनायक गायकवाड, कुंदा भिसे, शेखर चिंचवडे / सुजाता बोराटे, श्रुती डोळस, कुशाग्र कदम, तुषार सहाणे
शहर सुधारणा / संजय काटे, वैशाली काळभोर / विनोद नढे, कुणाल वाव्हळकर, अनंत कोऱ्हाळे / अर्चना सस्ते, सुहास कांबळे, उत्तम केंदळे, डॉ. वैशाली घोडेकर
क्रीडा- कला- साहित्य व सांस्कृतिक / कैलास कुटे, जितेंद्र ननावरे, प्रमोद कुटे / शाम जगताप, तानाजी बारणे, धर्मपाल तंतरपाळे, भाऊसाहेब भोईर / उदय गायकवाड, योगेश लांडगे
शिक्षण समिती / प्रियांका कुदळे / पल्लवी वाल्हेकर, श्रुती वाकडकर, रवीना आंगोळकर, योगिता बारणे / कविता भोंगाळे, सारिका बोऱ्हाडे, यश साने, रीटा सानप
महिला व बालकल्याण समिती / निकिता कदम, मनीषा लांडे / पल्लवी जगताप, नीता पाडाळे, रेश्मा भुजबळ / राणी पठारे, सुप्रिया चांदगुडे, सारिका मासूळकर, शिवानी नरळे