swt525.jpg
28840
बांदा ः ''स्वयंसिध्दा मी'' कार्यक्रमाची माहिती देताना अंकिता स्वार व इतर.
बांद्यात ‘क्रिएटिव्ह सखी’तर्फे
उद्यापासून ‘स्वयंसिध्दा मी’
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ५ ः जागतिक महिला दिनानिमित्त क्रिएटीव्ह सखी ग्रुपच्या वतीने बांदा येथे ७ व ८ मार्च असे दोन दिवस ''स्वयंसिध्दा मी'' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. येथील श्री विठ्ठल मंदिर नजीक व्यापारी भुवन सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. याबाबतची माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
व्यापारी भुवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत क्रिएटीव्ह सखी ग्रुपच्या अध्यक्षा अंकिता स्वार तसेच रिया वाळके, रुपाली शिरसाट, वंदना पावसकर, उज्ज्वला महाजन, श्रृती शिरोडकर, सिंधिया पावसकर, सावली कामत, स्नेहा पावसकर आदी उपस्थित होत्या. या कार्यक्रमात शॉपिंग स्टॉल्स, फूड स्टॉल्स, महिलांसाठी विविध स्पर्धांसह विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. यात शनिवारी (ता. ७) सकाळी १० वाजता महिला उद्योजिका आनंदी शिरोडकर यांच्या हस्ते ‘शॉपिंग फेस्टिव्हल’चे उद्घाटन होणार आहे.
हे स्टॉल्स रविवारपर्यंत (ता. ८) सकाळी १० ते रात्री १० या वेळेत सुरू असतील. सायंकाळी ५ वाजता ‘खेळ पैठणीचा’, फूड फेस्टिवल स्टॉल्सचे उद्घाटन गावातील आशा सेविकांच्या उपस्थितीत होणार आहे. हे स्टॉल्स दोन्ही दिवस सायंकाळी ४ वाजता ते १० पर्यंत सुरू असतील. रविवारी (ता. ८) सायंकाळी ५ वाजता महिलांसाठी पारंपरिक वेशभूषा स्पर्धेचे उद्घाटन मंडळाच्या अध्यक्षा अंकिता स्वार यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन क्रिएटीव्ह सखी ग्रुपच्या वतीने अध्यक्षा अंकिता स्वार यांनी केले आहे.