वाई:-व्याजवाडीतील सामाजिक ऐक्य,सलोखा आदर्शवत- मकरंद पाटील भक्तीचा जागर:श्री.संत शिरोमणी सावता महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापना
esakal March 06, 2026 03:45 PM

व्याजवाडीतील सामाजिक ऐक्य, सलोखा आदर्शवत

मकरंद पाटील; श्री संत शिरोमणी सावता महाराज मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना

वाई, ता. ५ : व्याजवाडी गावाची सामाजिक एकी श्री. सावता मंदिर आणि गणेश मंदिरातून अधोरेखित झाली असून, ग्रामस्थांची भक्ती आणि श्रद्धा वाखाणण्यासारखी आहे, असे प्रतिपादन मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी केले.
व्याजवाडी येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज व श्री गणेशमूर्ती प्रतिष्ठापना, कलशारोहण तसेच नूतन सभामंडपाचा उद्घाटन समारंभ झाला. या सोहळ्याने संपूर्ण व्याजवाडी परिसरात भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते धार्मिक विधीवत मूर्तींची प्रतिष्ठापना व मंदिराचे कलशारोहण करण्यात आले. सभामंडपाचे मंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
श्री. पाटील यांनी व्याजवाडी ग्रामस्थांच्या एकजुटीचे कौतुक केले. धार्मिक कार्यामुळे समाजात सलोखा निर्माण होतो आणि गावाच्या विकासाला अध्यात्माची जोड मिळते, असे त्यांनी सांगितले. या प्रसंगी दिलीप पिसाळ, विक्रम पिसाळ, शशिकांत पवार, शिवाजीराव पिसाळ, लक्ष्मणराव पिसाळ, संतोष पिसाळ, विठ्ठल पिसाळ, शहाजी पिसाळ, उत्तमराव भोसले, सतीश पिसाळ, डॉ. अमर जमदाडे, बापूसाहेब जमदाडे, महेंद्र जमदाडे, यशवंत जमदाडे, प्रदीप जमदाडे, बापूसाहेब राजपुरे, नामदेव मालुसरे, संपत मालुसरे, ज्ञानेश्वर मालुसरे, रामदास पिसाळ, बाबासाहेब पिसाळ, अरुण शेडगे, मारुती चव्हाण, संतोष पिसाळ, गणेश पिसाळ, संजय पिसाळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी तरुण मंडळ आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. सोहळ्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. त्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.

----
छायाचित्र ओळी
26B07659
व्याजवाडी : सभामंडपाचे उद्घाटन करताना मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील. त्या वेळी
अरविंद कुदळे व मान्यवर.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.