संजय गडदे, साम टीव्ही
नागरिकांना म्हाडाच्या विविध सेवा एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) ‘डिजीम्हाडा’ या मोबाईल अॅपचे लोकार्पण केले. वांद्रे (पूर्व) येथील म्हाडा मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते या अॅपचे उद्घाटन करण्यात आले.
Kalyan : कल्याणमध्ये दुचाकी चोरीचा पर्दाफाश, सराईत चोर अटकेत; १.९५ लाखांचा मुद्देमाल जप्तया अॅपच्या माध्यमातून नागरिकांना ई-बिलिंग, तक्रार निवारण, ई-लिलाव, कंत्राटदार नोंदणी, सदनिका सोडतीसाठी ऑनलाइनअर्ज, अर्जाची स्थिती तपासणे तसेच विविध गृहनिर्माण योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. तसेच माहितीचा अधिकार (RTI) अर्ज ऑनलाइन करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Kalyan : कल्याणमध्ये दुचाकी चोरीचा पर्दाफाश, सराईत चोर अटकेत; १.९५ लाखांचा मुद्देमाल जप्तनागरिकांना अधिकृत व अचूक माहिती सहज मिळावी, कार्यालयीन भेटी आणि कागदोपत्री प्रक्रिया कमी व्हावी तसेच सेवा वितरण अधिक वेगवान आणि पारदर्शक व्हावे, या उद्देशाने ‘डिजीम्हाडा’ विकसित करण्यात आल्याचे संजीव जयस्वाल यांनी सांगितले. याशिवाय नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी म्हाडाने व्हॉट्सअॅप सेवा देखील सुरू केली असून त्यासाठी 9326258911 हा क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.