चित्तेपिंपळगाव ,ता ५( बातमीदार ): बिड - छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील झाल्टा ता. छत्रपती संभाजीनगर गावाजवळ गुरूवार ता ५ रोजी रस्त्याच्या साइड इफेक्ट (पांढरे पट्टे) मारण्याचे काम सुरू असताना भरधाव मालवाहू टॅंकर क्रमांक एम एच, २७ डि ,टि ४५०६ ने दिलेल्या जोरदार धडकेत कुंडलिक नवगिरे (वय ४० वर्ष ) रा पिंपळगाव (पांढरी) ता. छत्रपती संभाजीनगर या कामगाराचा जागीच मृत्यू झाला.
हा अपघात येवढा भीषण होता की टँकरने पाठीमागून जोराची धडक देताच कामासाठी वापरण्यात येणाऱ्या मशीनचा लोखंडी दांडा नवगिरे यांच्या पोटात घुसून पाठीतून बाहेर निघाला होता. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून रस्ते कामगारांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
kankavli : नर्सिंग महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीचा मृत्यू, संतप्त जमावाकडून रुग्णालयाची तोडफोड, डॉक्टरांना धक्काबुक्की; नक्की काय घडलं?स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, झाल्टा परिसरात महामार्गावरील साइड इफेक्ट पट्टे मारण्याचे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले असून ते ठेकेदारामार्फत सुरू होते. कुंडलिक नवगिरे हे मशीन चालवून रस्त्यावर पट्टे मारत होते. त्यावेळी मागील बाजूने भरधाव वेगात आलेल्या मालवाहू टँकरने काम सुरू असलेल्या ठिकाणी थेट जोराची धडक दिली. या मालवाहू टँकरचा वेग भरधाव असल्याने मशीनसह कामगार दूर फेकले गेले. मशीनचा दांडा थेट कुंडलिक नवगिरे यांच्या पोटात घुसल्याने त्यांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला.
अपघातानंतर अपघातस्थळी काही काळ तणाव निर्माण झाला होता मृत्यू पावलेल्या कामगाराचे नातेवाईकांनी संबंधित कंपनीला व खाजगी ठेकेदाराला दोषी ठरवून या कंपनीमुळे व ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे कुंडलिक नवगिरे यांचा जिव गेल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला असून संबंधीत कंपनी व ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. स्थानिकांनी तात्काळ चिकलठाणा पोलिसांना व रुग्णवाहिकेला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात पाठविला. टँकर चालकाला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास चिकलठाणा पोलिस करत असून,
या दुर्घटनेमागे संबंधित कंपनी व ठेकेदाराचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप नातेवाईकांनी व कामगार संघटनांनी केला आहे. महामार्गावर काम सुरू असताना आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. कामाच्या ठिकाणी न चेतावणी फलक लावण्यात आले होते, ना अडथळे (बॅरिकेड्स) उभारण्यात आले होते. तसेच वाहतुकीसाठी वेग मर्यादा दर्शविणारे संकेतही नसल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली होती. कामगारांना कोणतेही संरक्षक साहित्य (हेल्मेट, जॅकेट, रिफ्लेक्टर) दिले नसल्याचेही समोर आले आहे.
कुंडलिक नवगिरे हे आपल्या कुटुंबाचे एकमेव उदरनिर्वाहाचे साधन होते. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पत्नी, दोन मुली व एक मुलगा मुले असा परिवार त्यांच्या मागे आहे. कुटुंबीयांनी संबंधित कंपनीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली असून शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही केली आहे.
kankavli : नर्सिंग महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीचा मृत्यू, संतप्त जमावाकडून रुग्णालयाची तोडफोड, डॉक्टरांना धक्काबुक्की; नक्की काय घडलं?या घटनेनंतर प्रशासनाने महामार्गावरील सुरू असलेल्या कामांची सुरक्षा व्यवस्था तपासण्याचे आदेश दिले आहेत. भविष्यात अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी कामगारांच्या सुरक्षेसाठी कठोर नियम लागू करणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. हा अपघात म्हणजे केवळ एक दुर्घटना नसून कामगारांच्या जीवाशी चाललेला हलगर्जीपणाचा खेळ असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.