बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रीनं विकला मुंबईतला लक्झरी फ्लॅट; रातोरात झाली मालामाल, किंमत ऐकाल तर...
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क March 06, 2026 10:43 AM

Preity Zinta Makes Big Deal In Mumbai Real Estate: मुंबईच्या (Mumbai) रिअल इस्टेट मार्केटमध्ये (Real Estate Market) अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी (Bollywood Celebrity) मोठी गुंतवणूक केली आहे. त्यापैकीच एक असलेल्या बड्या अभिनेत्रीनं मात्र, तिचा लक्झरी फ्लॅट (Luxury Flat) विकला आहे. बॉलिवूडची डिम्पल गर्ल असलेल्या प्रिती झिंटानं (Preity Zinta) वांद्रे येथील तिचं लक्झरी अपार्टमेंट विकलं आहे. हा फ्लॅट अंदाजे 18.5 कोटींमध्ये विकला गेल्याचं वृत्त आहे. जुन्या इमारतीच्या पुनर्विकासानंतर प्रितीला हे अपार्टमेंट मिळालं होतं. कोट्यवधींच्या या करारामुळे प्रिती झिंटा पुन्हा एकदा मुंबईच्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये चर्चेत आहे. मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार, हे अपार्टमेंट मुंबईतील वांद्रे येथील प्रसिद्ध पाली हिल परिसरात आहे. हा परिसर मुंबईतील सर्वात महागड्या आणि मागणी असलेल्या परिसरांपैकी एक मानला जातो, जिथे अनेक सिनेस्टार्स आणि प्रमुख बिझनेसमन राहतात.

प्रितीनं विकलं 1,770 स्क्वेअर फुटांचं अपार्टमेंट 

प्रिती झिंटाच्या जवळच्या सूत्रांनी डिसेंबर 2025 मध्ये हिंदुस्तान टाईम्स रिअल इस्टेटला सांगितलेलं की, हे अपार्टमेंट अंदाजे 1,770 चौरस फूट आकाराचं आहे आणि इमारतीच्या 11 व्या मजल्यावर आहे. ही मालमत्ता प्रिया नागर आणि राजीव नागर यांनी खरेदी केली होती. या मालमत्तेची नोंदणी 2 मार्च 2026 रोजी पूर्ण झाली. ज्या इमारतीत हा फ्लॅट आहे, ती इमारत मूळतः बरीच जुनी होती आणि नंतर तिचा पुनर्विकास करण्यात आला. पुनर्विकासादरम्यान, विद्यमान फ्लॅट मालकांना नवीन इमारतीत नवीन अपार्टमेंट दिले जातात. याच काळात प्रीती झिंटालाही हा नवा फ्लॅट मिळाला. असं म्हटलं जातं की, इमारतीचा पुनर्विकास कीस्टोन रिअल्टर्सनं केला होता, ज्याला रुस्तमजी म्हणूनही ओळखलं जातं.

4 महिन्यांत 2 अपार्टमेंटची झाली डील

प्रिती झिंटानं यापूर्वी याच इमारतीतील आणखी एक फ्लॅट विकलेला. मीडिया रिपोर्टनुसार, नोव्हेंबर 2025 मध्ये, तिनं त्याच इमारतीच्या 11 व्या मजल्यावरील आणखी एक अपार्टमेंट 14 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीला विकलं. त्या फ्लॅटचं क्षेत्रफळ अंदाजे 1,474 चौरस फूट असल्याचं सांगण्यात आलं आहे. गेल्या चार महिन्यांतील हा तिचा दुसरा मालमत्ता करार आहे. यामुळे प्रिती झिंटा मुंबईत नवी, मोठी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करतेय का? असा प्रश्न उपस्थित होतो. गेल्या वर्षी, काही रिपोर्ट्समध्ये असंही सुचवण्यात आलं होतं की, ती या विक्रीतून मिळणारे पैसे मुंबईत एका नव्या, आलिशान मालमत्तेत पुन्हा गुंतवू शकते, ज्याची किंमत 100 कोटींपर्यंत असू शकते. दरम्यान, प्रिती झिंटानं याबाबक कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.

Rashmika Vijay Reception Viral Video: रश्मिका-विजयच्या रिसेप्शन सोहळ्यात हाणामारी; गपचूप घुसणाऱ्या व्यक्तीला बाउन्सर्सनी उचललं अन्... VIDEO

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.