'ठरलं तर मग' या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांना आपलंसं केलंय. ही मालिका गेली तीन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. त्यातही अर्जुन आणि सायली यांची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. गेल्या काही दिवसात या मालिकेचा टीआरपी कमी झाला होता. त्यामुळेच मेकर्सनी मालिकेत निरनिराळे ट्विस्ट आणायचं ठरवलं. मूळ मुद्द्यावरून भरकटलेली कथा पुन्हा एकदा ट्रॅकवर येणार आहे. यापूर्वी नागराजचे सगळे काळे कारनामे सगळ्यांसमोर आले होते. महिपतने मुलगी साक्षीला वाचवण्यासाठी नागराजच्या विरोधात साक्ष दिलेली. त्यामुळे ते दोघेही जेलमध्ये आहेत. आता मालिकेत आणखी एक ट्विस्ट येणार आहे.
आजच्या म्हणजेच ६ मार्चच्या भागात अर्जुन आणि सायली यांच्या हाती एक मोठा पुरावा लागणार आहे. अर्जुन आणि सायली यांनी प्रियाचे ब्लड सॅम्पल चेक करायला दिले आहेत. तिचं रक्त खऱ्या तन्वीसोबत जुळतंय की नाही हे पाहण्यासाठी सगळं सुरू आहे. मात्र आता होळीच्या मुहूर्तावर अर्जुनला मेसेज येणार आहे. ज्यात प्रियाचे ब्लड सॅम्पलचे रिपोर्ट आहेत. त्यामध्ये प्रियाचा ब्लड ग्रुप हा ए बी पॉझिटिव दाखवण्यात आलाय. तर रविराज किल्लेदार ने सांगितल्याप्रमाणे खऱ्या तन्वीचा ब्लड ग्रुप हा ओ निगेटिव्ह असतो. त्यामुळे 22 वर्षांपूर्वी हरवलेली तन्वी आणि आत्ताची घरात वावरणारी तन्वी या दोघेही वेगवेगळ्या आहे हे सायली अर्जुनला कळणार आहे.
सगळं सत्य समजल्यावर पुन्हा एकदा ते दुसरं मत घेण्यासाठी जातात. तिथेही तन्वी आणि प्रिया यांचा ब्लड ग्रुप वेगळा निघतो. यावेळेस प्रिया पुरती फसली आहे. तिला याबद्दल मुळीच कल्पना नसते. ती चांगल्या सुनेचं नाटक करण्यात व्यस्त असताना आता तिचं पितळ उघडं पडलंय. अर्जुन याबद्दल तिला जाब विचारणार आहे मात्र तेव्हा सायली त्याला अडवणार आहे. कारण प्रियाबद्दल अगदी ठोस पुरावे त्यांच्याकडे नाहीत. आता हे दोघे ते पुरावे कसे मिळवतात आणि प्रियाचं खोटं प्रेक्षकांसमोर कसे आणतात हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
नाटकवेड्या प्रेक्षकांसाठी खुशखबर; गाजलेली मराठी नाटकं पाहा फक्त १०० रुपयात; कधी कुठे वाचा सविस्तर