लखीमपुर खेरी येथील दुधवा टायगर रिझर्व्हमधून (Dudhwa Tiger Reserve) निसर्गाच्या साखळीतील एक दुर्मिळ पण थरारक घटना समोर आली आहे. जंगलाचा राजा मानल्या जाणाऱ्या वाघाने चक्क एका महाकाय गेंड्यावर हल्ला करून त्याला ठार केले आहे.
ही घटना दक्षिण सोनारीपूर रेंजमधील पहिल्या गेंडा पुनर्वसन केंद्रात (Rhino Rehabilitation Centre) घडली आहे. बुधवारी सकाळी जेव्हा गेंडा मॉनिटरिंग टीम हत्तीवर स्वार होऊन गस्त घालत होती, तेव्हा त्यांना हे धक्कादायक दृश्य दिसले.
हत्तीवर स्वार पथकाचे निरीक्षण: गस्त घालणाऱ्या टीमला 'अमहा ताल' या पाणवठ्याजवळ एक वाघ दिसला. हा वाघ पाण्यात अर्ध्या बुडालेल्या एका गेंड्याच्या शरीरावर बसून त्याचे मांस ओरबाडत होता. वाघ बराच वेळ त्या मृत गेंड्यावर अधिराज्य गाजवत बसून होता. टीमने या घटनेचे फोटो टिपले आणि त्यानंतर वाघाला तिथून हाकलून लावले. मृत गेंडा ही एक मादी असून तिची ओळख 'राजेश्वरी' म्हणून करण्यात आली आहे.
पोस्टमॉर्टममध्ये पुष्टीदुधवा टायगर रिझर्व्हचे फील्ड डायरेक्टर डॉ. एच. राजा मोहन यांनी सांगितले की, राजेश्वरी या मादी गेंड्याचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यामुळेच झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालात (Post-mortem) स्पष्ट झाले आहे. वाघाने गेंड्यावर इतक्या ताकदीने हल्ला केला होता की, महाकाय शरीर असूनही राजेश्वरी आपला जीव वाचवू शकली नाही.
Rajgad Honey Bee Attack : पर्यटकांच्या परफ्युमचा वास अन् मधमाशा चवताळल्या; अनेक पर्यटक हल्ल्यात जखमी! दुर्मिळ संघर्षसाधारणपणे वाघ गेंड्यासारख्या मोठ्या प्राण्यावर हल्ला करणे टाळतो, परंतु दुधवामध्ये याआधीही अशा काही घटना घडल्या आहेत. वाघाने स्वतःचे अस्तित्व आणि अन्नासाठी केलेल्या या शिकारीमुळे वन्यजीव प्रेमींमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
प्रशासनाने आता या परिसरात गस्त वाढवली असून इतर गेंड्यांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.