Arjun Tendulkar Networth: सचिन तेंडुलकरच्या लेकाकडे एकूण संपत्ती किती? जाणून घ्या…
Tv9 Marathi March 06, 2026 10:45 PM

क्रिकेट सम्राट सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन नुकताच लग्न बंधनात अडकला आहे. त्याच्या लग्नाची देशात चर्चा रंगली होती. अर्जुन ५ मार्च २०२६ रोजी लग्नबंधनात अडकला. त्याने सानिया चांदोकशी लग्न केले. मोठ्या धुमधडाक्यात मुंबईत त्यांचा विवाहसोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. दरम्यान, अर्जुन तेंडुलकरकडे एकूण किती संपत्ती आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

अर्जुन तेंदुलकर आणि सानिया चंदोक

अर्जुनचा साखरपुडा गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सानिया चंदोकशी झाला होता. सानियाचे आजोबा रवि घई हे भारतातील प्रमुख उद्योगपतींपैकी एक आहेत. अर्जुन आणि सानिया एकमेकांना बराच काळ ओळखतात. अर्जुनची बहीण सारा तेंडुलकरच्या फोटोंवरुन त्या तिघांचा बाँड पाहायला मिळत आहे. सानिया, अर्जुन आणि सारा हे तिघेही एकत्र अनेकदा फिरायला गेल्याचे फोटो पाहायला मिळाले.

लक्झरी कारचा शौक

अर्जुन तेंडुलकर आपल्या कुटुंबासोबत मुंबईच्या बांद्रा वेस्टमधील १९-ए पॅरी क्रॉस रोड या बंगल्यात राहतो. त्याला लग्जरी कारचा खूप शौक आहे. अहवालानुसार, सचिन आणि अर्जुन यांच्याकडे बीएमडब्ल्यू i8, मर्सिडीज-एएमजी सी३६, किया कॅरेंस, पोर्श कायेन, फेरारी ३६० मोडेना सारख्या महागड्या गाड्या आहेत.

अर्जुनची आयपीएल सॅलरी

अर्जुन तेंडुलकरला २०२१ मध्ये मुंबई इंडियन्सने २० लाख रुपयांना खरेदी केला गेला होता. २०२२ मध्ये त्यांची किंमत ३० लाख झाली. २०२३ मध्ये त्यांना एमआयकडून डेब्यू मिळाले. २०२३ ते २०२५ पर्यंत ते ३० लाख रुपयांवरच एमआयचे सदस्य होते. आयपीएल २०२६ पूर्वी ट्रेडद्वारे अर्जुन लखनऊ सुपर जायंट्स (LSG) मध्ये गेले असून, तेथेही त्यांची किंमत ३० लाख रुपये आहे. म्हणजेच आयपीएल करारातून त्यांनी आतापर्यंत सुमारे १ कोटी ७० लाख रुपये कमावले आहेत.

अर्जुन तेंडुलकरची नेटवर्थ किती?

आयपीएल व्यतिरिक्त अर्जुनची कमाई घरगुती क्रिकेटमधून होते. सध्या ते गोवा संघाचे प्रतिनिधित्व करतात. विविध अहवालांनुसार, अर्जुनची नेटवर्थ २० ते २२ कोटी रुपये आहे (मार्च २०२६ पर्यंत). यात आयपीएल करार, घरगुती क्रिकेट (वार्षिक १०-१५ लाख), ब्रँड एंडोर्समेंट्स (वार्षिक ५० लाख ते १ कोटी) यांचा समावेश आहे.

क्रिकेट रेकॉर्ड

फर्स्ट क्लास: २४ मॅचमध्ये ५२ विकेट्स, ६८५ रन्स.

लिस्ट ए: २४ मॅचमध्ये २६ विकेट्स.

टी२०: २९ मॅचमध्ये ३५ विकेट्स आणि १८९ रन्स.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.