PM Kisan Yojana: तारीख ठरली! राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात या दिवशी येणार ₹६०००; वाचा मोठी अपडेट
Saam TV March 06, 2026 04:45 PM

राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर

शेतकऱ्यांना मिळणार ६००० रुपये

पीएम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता एकत्र येणार

या दिवशी खात्यात पैसे येण्याची शक्यता

देशभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. आता पीएम किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. याचसोबत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणखी एक गुडन्यूज मिळणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ६००० रुपये मिळणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी ६००० रुपये जमा होऊ शकतात.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹२१०० येणार? देवेंद्र फडणवीस आज मोठी घोषणा करण्याची शक्यता

राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार ₹६००० (Maharashtra Farmers Will Get ₹6000)

केंद्र सरकारने पीएम किसान योजना राबवली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात ६००० रुपये दिले जातात. प्रत्येकी २००० रुपयांचा हप्ता दिला जातो. आता शेतकरी पीएम किसान योजनेचा २००० रुपयांच्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) धर्तीवरचराज्य सरकारने नमो शेतकरी योजना (Namo Shetkari Yojana) राबवली आहे. नमो शेतकरी योजनेतदेखील शेतकऱ्यांना ६००० रुपये दिले जातात. या योजनेचे दोन हप्ते एकत्र येणार आहेत.नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता अजूनही दिलेला नाही. त्यामुळे यावेळी आठवा आणि नववा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हे दोन हप्ते मिळून ४००० रुपये मिळतील. त्यात पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता मिळणार आहे. शेतकऱ्यांना एकूण ६००० रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेत ₹२००० हवेत? आजच करा eKYC; स्टेप बाय स्टेप करा फॉलो

या दिवशी मिळणार शेतकऱ्यांना पैसे (Farmers Will Get Money on These Date)

राज्यातील १४ लाख शेतकरी या दोन्ही योजनेचा लाभ घेत आहेत. एप्रिल महिन्यात या शेतकऱ्यांना प्रत्येकी ६००० रुपये मिळू शकतात, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या अॅग्रीस्टॅकद्वारे शेतकऱ्यांची माहिती गोळा केली जात आहे. यातून अपात्र शेतकऱ्यांची नावे वगळली जात आहे. यामुळे हप्ता येण्याची उशिर झाला असल्याचे म्हटले आहे.

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट, ८ दिवसात खात्यात ₹२००० येणार?
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.