जगात हाहाकार! जर तुमच्यात हिंमत असेल तर… इराणकडून थेट धमकी, 5 तासात…
admin March 07, 2026 11:24 AM
[ad_1]
जगात हाहाकार! जर तुमच्यात हिंमत असेल तर… इराणकडून थेट धमकी, 5 तासात…

इराण, अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यातील युद्धामुळे अनेक देश संकटात आले. इराणकडून अमेरिकेचे लष्कर तळ उ्दवस्थ करण्यासाठी तब्बल 10 देशांमध्ये हल्ले करण्यात आले. तेहरान शहरामध्ये सर्वाधिक नुकसान झाले. अमेरिका आणि इस्त्रायलच्या निशाण्यावर इराणचे तेहरान शहर आहे. इराणच्या प्रमुख शहरांना टार्गेट करत हल्ले केले जात आहेत. इस्त्रायलवरही मोठा क्षेपणास्त्र मारा इराणकडून केला जात आहे. इराणची नाैदल ताकद कमी करण्याकरिता इराणच्या युद्धनाैकांवर हल्ला करून ते अमेरिकेकडून बुडवले जात आहे. भारतातून युद्ध सराव करून निघालेल्या इराण युद्धनाैकेवरही मोठा हल्ला अमेरिकेने केला. इराणकडूनही सतत हल्ले केले जात आहेत. या युद्धामुळे जगातील अर्ध्यापेक्षा अधिक देशांमध्ये तेलाची आणि गॅसची आणीबाणी लागू झाली. गॅस पुरवठा जवळपास ठप्प झाला. इराणकडून त्यांचा होर्मुझ हा मार्गही बंद करण्यात आला.

होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत इराणने अमेरिका आणि इस्रायलला एक नवीन मोठा इशारा दिला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना थेट चॅलेंज देत इराणने म्हटले की, तुम्ही फक्त तेल टँकरला संरक्षण देऊन दाखवा… काही दिवसांपूर्वीच होर्मुझच्या सामुद्रधुनी मार्ग इराणकडून बंद करण्यात आला. ज्यामुळे अनेक देशातील तेल पुरवठा खंडीत झाला. यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की, हा मार्ग बंद झाला नाही, आम्ही तेल टँकरला संरक्षण देऊ. आता त्यावरच डोनाल्ड ट्रम्प यांना खुले आव्हान इराणकडून देण्यात आले.

मुळात म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी ही जागतिक तेल व्यापारासाठी सर्वात महत्त्वाची कॉरिडॉर आहे, या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणकडून याला बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. युद्ध सुरू झाल्यावरच इराणकडून हे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला, ज्यामुळे हजारो जहाज अडकून पडले असून तेलाचा पुरवठा बंद आहे.

इराणच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने बोलताना स्पष्ट सांगितले की, इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केलेली नाही. अमेरिका आणि इस्त्रायलसोबत संबंध असलेले जहाज तिथून जाऊ शकत नाहीत. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही ट्रम्प यांना आव्हान देतो की त्यांनी अमेरिकन जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल टँकर बाहेर काढण्याची परवानगी द्यावी फक्त. यावर अमेरिकेने म्हटले की, या मार्गाने जहाज काढण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत. लवकरच यश मिळेल. पुढील 5 तासात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे..


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.