रत्नागिरीच्या कॅरमपटू, बुद्धिबळपटूंचे वर्चस्व
esakal March 07, 2026 03:45 PM

- rat६p६.jpg -
२६O२८९३२
कॅरम स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंसह मान्यवर
----
बुद्धिबळसह कॅरममध्ये रत्नागिरीचे वर्चस्व
डेरवण युथ स्पर्धा ; विविध गटात १६ बुद्धिबळपटूंना पदके
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ६ : डेरवणच्या एव्हीजेसीटी क्रीडासंकुलात पार पडलेल्या बाराव्या ‘डेरवण यूथ गेम्स २०२६’ मधील बुद्धिबळ स्पर्धेवर रत्नागिरीच्या बुद्धिबळपटूंनी ठसा उमटवला. सर्व वयोगटात मिळून रत्नागिरी जिल्ह्यातील १६ बुद्धिबळपटू पदकविजेते ठरले. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन बुद्धिबळपटूंनी पदके जिंकली.
डेरवण येथील क्रीडासंकुलात मैदानी खेळांबरोबरच बुद्धिबळाचे सामने पार पडले. राज्यभरातून आलेले विविध वयोगटातील बुद्धिबळपटू यात सहभागी झाले होते. ९ वर्षांखालील गटात रत्नागिरीच्या आरव निमकर, १० वर्षांखालील गटात रत्नागिरीच्या चेतन शिंदे, ११ वर्षांखालील गटात रत्नागिरीच्या विराज बनसोड, १२ वर्षांखालील गटात रत्नागिरीच्या सोहम करुवर, १६ वर्षांखालील गटात ओमकार सितप यांनी सुवर्णपदक पटकावले. १० वर्षांखालील गटात रत्नागिरीच्या मयंक जाधवने रौप्य, रियांश जावळेने कांस्य पदक पटकावताना संपूर्ण गटावरच रत्नागिरीचे वर्चस्व दाखवून दिले. १६ वर्षांखालील मुलींच्या गटात पुण्याची आर्या सितप, रत्नागिरीच्या निधी लेले आणि रत्नागिरीच्या सानवी दामले यांनी बुद्धिबळपटूंनी सर्वोत्तम महिला खेळाडूंचा मान पटकावला.
दरम्यान, कॅरम स्पर्धेतही रत्नागिरीच्या खेळाडूंनी बाजी मारली. सिंधुदुर्गातील साक्षी रामदुरकरने सुवर्णपदक पटकावले. रत्नागिरीच्या स्वरा मोहिलेने रौप्यपदक मिळवले. तर कोल्हापूरच्या ओमकार वाडकरने सुवर्णपदक पटकावले. रत्नागिरीच्या श्रेयांश वाघाटेने रौप्य तर रत्नागिरीच्या अनय भागवतने कांस्यपदक पटकावले.
-----
१५ खेळाडू सर्वोत्तम
या स्पर्धेतील कामगिरीच्या निकषावर एकूण १५ खेळाडूंची सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाली. त्यात सिंधुदुर्गातील वैभव राऊळ याने सातपैकी सहा गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला. एकूण १०८ बुद्धिबळपटू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. यापैकी १० खेळाडू आंतरराष्ट्रीय गुणांकन मिळवलेले होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.