Parth Pawar: राज्यसभेचा अर्ज भरेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनिकरणाची चर्चा होती सुरु! पण पार्थ पवार...
Sarkarnama March 07, 2026 11:45 PM

Parth Pawar: राज्यातील ज्येष्ठ नेते दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनाला दीड महिना होत आला पण अद्यापही राष्ट्रवादीच्या विलिनिकरणाची चर्चा पुन्हा वर आली आहे. अजितदादा हयात असताना त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनिकरणाबाबत चर्चा केली होती, असा दावा शऱद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी सातत्यानं करत आहेत.

आता पुन्हा एकदा हा विषय चर्चेला आला आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनिकरणाची चर्चा नुकत्याच बिनविरोध झालेल्या राज्यसभा निवडणुकीचे अर्ज भरण्यापर्यंत सुरु होती, अशी माहिती समोर आली आहे. पण आता या चर्चेला खिळ बसली असल्याचं बोललं जात आहे. याला कारणीभूत ठरले आहेत अजित पवारांचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ पवार.

Jay Pawar: रोहित पवारांनंतर आता जय पवारही मैदानात! अजित पवारांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या VSR विमान कंपनीबाबत करणार मोठा खुलासा नेमका विषय काय?

माध्यमांमधील वृत्तानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनिकरणावर जर ठोस निर्णय झाला असताना तर राज्यसभेच्या जागेसंदर्भात एकत्रित राष्ट्रवादीकडून उमेदवार देण्यात आला असता. पण तत्पूर्वीच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं मुंबईतील वरळी डोम इथं राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. तसंच याच कार्यक्रमात पार्थ पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आल्याची घोषणा पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केली. अशा प्रकारे ज्यावेळी पार्थ पवार यांचं नाव राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आलं, त्यानंतर लगेचच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी देखील जाहीर केलं की दोन्ही पक्षांच्या विलिनिकरणाचा विषय आता पुढे जाणार नाही.

Mumbai News: घाटकोपर मुंबईत की गुजरातमध्ये? महापालिकेची कागदपत्रे दिली जाताहेत गुजराती भाषेतून; हिंदू स्माशनभूमीत नेमकं काय घडलं?

त्यानंतर अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी महाविकास आघाडीकडून शरद पवारांची राज्यसभेची टर्म संपली असल्यानं त्यांनाच पुन्हा उमेदवारी घोषित करण्यात आली. त्यामुळं पवार कुटुंबातील दोन जण अर्थात आजोबा आणि नातू राज्यसभेवर खासदार म्हणून बिनविरोध निवडले गेले. त्यामुळं या दोघांचे उमेदवारी अर्ज भरेपर्यंत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनिकरणाची चर्चा सुरु होती, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याच्या हवाल्यानं काही माध्यमांनी दिली आहे. पण पार्थ पवारांचं नाव राज्यसभेसाठी जाहीर झाल्यानं विलिनिकरणाच्या चर्चेला ब्रेक बसल्याचंही याच नेत्यानं सांगितल्याचं या वृत्तांमध्ये म्हटलं आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.