अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथील ऐतिहासिक ‘वर्ल्ड वॉर 2’ या स्मारकासमोर डान्स करणे एका हिंदुस्थानी वंशाच्या तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर जगभरातून टीकेची झोड उठली असून आता अमेरिकन प्रशासनाकडून त्याच्यावर हकालपट्टीची कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मधू राजू असे या तरुणाचे नाव असून तो नॉन-इमिग्रंट व्हिसावर अमेरिकेत वास्तव्यास आहे.







