List of T20 World Cup 2026 awards: पाकड्याला नमवून संजू सॅमसनने जिंकले दोन पुरस्कार, तर जसप्रीत बुमराहने पटकावले तीन...
esakal March 09, 2026 06:46 PM

Sanju Samson Player of the Tournament T20 World Cup 2026 stats: भारतीय संघाच्या नावावर आता ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची सर्वाधिक ३ जेतेपदं झाली आहेत. भारताने रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडवर ९६ धावांनी विजय मिळवताना जेतेपदाची ट्रॉफी आपल्याकडेच ठेवली. सलग दोन वर्ल्ड कप जिंकणारा, भारत हा जगातील पहिलाच देश ठरला. भारताने २००७ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पहिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला, त्यानंतर तब्बल १८ वर्षांनी म्हणजेच २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ही ट्रॉफी पुन्हा जिंकली आणि २०२६ मध्ये सूर्यकमार यादवच्या संघाने जेतेपद कायम राखले. आयसीसी जेतेपदासह भारतीय खेळाडूंनी पुरस्कारांमध्येही वर्चस्व गाजवले.

भारताकडून ५ सामन्यांत सर्वाधिक ३२१ धावा करणाऱ्या संजू सॅमसनला प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट हा पुरस्कार दिला गेला. या पुरस्कारासाठी इंग्लंडचा विल जॅक्स, पाकिस्तानचा साहिबजादा फरहान, दक्षिण आफ्रिकेचा लुंगी एनगिडी आणि एडन मार्करम, न्यूझीलंडचा रचिन रवींद्र व टीम सेइफर्ट शर्यतीत होते. पण, संजूने बाजी मारली... त्याला Player of the Tournament सह आणखी एक पुरस्कार मिळाला.. स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह व वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी १४ विकेट्स घेतले.

भारताच्या विजयात आमचाही वाटा...बाहेर बसून, खेळाडूंना पाणी पाजलं, नेट्समध्ये गोलंदाजी केली; मोहम्मद सिराजचा मजेशीर Video Viral

वर्ल्ड कप फायनलमध्ये १५ धावांत ४ विकेट्स घेणारा जसप्रीत हा सामनावीर ठरला. त्याशिवाय त्याने आणखी दोन पुरस्कारांवर नाव कोरले...

List of T20 World Cup 2026 awards
  • Player of the Final: जसप्रीत बुमराह , भारत ( ४ षटकांत १५ धावांत ४ विकेट्स)

  • Player of the Tournament: संजू सॅमसन, भारत ( ३२१ धावा, ५ सामने, सरासरी ८०.२५, स्ट्राइक रेट १९९.३७)

  • Most Runs: साहिबजादा फरहान, पाकिस्ता ( ३८३ धावा)

  • Most Wickets: जसप्रीत बुमराह, भारत ( १४ विकेट्स) वरुण चक्रवर्तीपेक्षा चांगली सरासरी, इकॉनॉमी आणि स्ट्राईक रेट...

  • Most Sixes: संजू सॅमसन, भारत ( ५ सामन्यांत २४ षटकार)

  • Best Batting Strike Rate: फिन अॅलन, न्यूझीलंड ( २००.००)

  • Best Bowling Economy Rate: जसप्रीत बुमराह, भारत ( ६.२१)

T20 World Cup विजेती टीम इंडिया पुन्हा निळ्या जर्सीत केव्हा दिसणार? जाणून घ्या २०२६ मधील वेळापत्रक; संजू पुन्हा इंग्लंड, किवींना झोडणार

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू संजू सॅमसन म्हणाला, हे स्वप्नासारखे वाटते! खूप आनंदी, अत्यंत कृतज्ञ! मी मागील वर्ल्ड कपमध्ये एकही सामना खेळू शकलो नाही, परंतु मी स्वतःवर विश्वास ठेवला आणि स्वप्न जिवंत ठेवले. प्रामाणिकपणे सांगायचे तर, मला गोष्टींबद्दल खात्री नव्हती, परंतु संधी मिळाल्याने मी त्यांचा फायदा घेतला. मी संघातील वरिष्ठ खेळाडूंकडून सल्ला घेतला आहे. मी सचिन तेंडुलकर सरांच्या सतत संपर्कात आहे, त्यांच्याकडून सल्ला घेतला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.