पैठण: पैठण येथील खुले कारागृहातील कैद्यांकडून मोबाईलसह विविध अवैध वस्तू बाळगल्याचा प्रकार उघडकीस आल्याने कारागृह प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी एकूण 21 कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त करण्यात आलेल्या साहित्याची किंमत 58 हजार 730 रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत वरिष्ठ तुरुंग अधिकारी दीपक भोसले (वय 46) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार 6 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास पैठण खुल्या कारागृहाअंतर्गत विहामांडवा येथील शेती शेड परिसरात तपासणी करण्यात आली.
Pune Crime: पुण्यात अमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई; वाघोलीत तब्बल ७६ लाखांचे मॅफेड्रॉन जप्त, राजस्थानातील दोन तस्कर गजाआडया वेळी कैद्यांकडे मोबाईल व इतर अवैध वस्तू आढळून आल्याने त्यांची जप्ती करण्यात आली. या प्रकरणी सलमान शफीक शेख (रा. अहिल्यानगर), रफिक शेख, रफू रमेश सोनवणे, असिफ रोशन शेख, नांगरे ललितकिशोर कन्नोजिया, राजेश समरथीन चौधरी, मंगेश संतुराम गुमस्ते, शकील शेख, शिवाजी रामाजी वडजे, मुजफ्फर माशूक अली शेख, कृष्णा सिताराम पवार, आकाश गंगाराम शिंगे, शेख चाँद पाशाबशीर, जयसिंग देवप्पा राठोड, असिफखान शब्बीर खान, धारासिंग बकिलसिंग बावरी, नरसिंग शंकरराव तळणीकर, जयसिंग जब्बू पवार, सुनील निंबा पाटील, मुस्तफा इलाही शेख व निलेश प्रकाश महाजन या कैद्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कारागृह नियमांचे उल्लंघन करून मोबाईलसारख्या अवैध वस्तू बाळगल्याप्रकरणी कारागृह कायदा 1894 मधील कलम 42, 45(12) तसेच भारतीय दंड संहिता कलम 223 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pachod Crime : पाचोड येथे कारमध्ये साठवलेला गुटखा पकडला; गुटखा विक्रेत्यावर कारवाई; सहा लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त!कारागृह नियमांचे उल्लंघन करून मोबाईलसारख्या अवैध वस्तू बाळगल्याप्रकरणी कारागृह कायदा 1894 मधील कलम 42, 45(12) तसेच भारतीय दंड संहिता कलम 223 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास विहामांडवा चौकीचे पोलीस ब्राह्मणे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. कारागृह परिसरात कैद्यांकडून अवैध साहित्य सापडल्याने प्रशासनात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.