तळेगाव दाभाडे, ता. ९ ः छत्रपती शिवाजी महाराज यांनी वडगाव येथे बांधलेल्या नारोजी बापूजी देशपांडे यांच्या समाधी स्थळाचे सुशोभीकरण करण्याची मागणी तीर्थक्षेत्र श्री पोटोबा, मारुती, महादेव, दत्त देवस्थान संस्थानने केली आहे. याबाबत वडगाव नगरपंचायतीला निवेदन देण्यात आले. या समाधी स्थळाची दुरवस्था झाल्याचे वृत्त ‘सकाळ’ने दिले होते. त्यानंतर देवस्थान संस्थानचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे व सचिव अनंता कुडे यांनी निवेदन जारी केले. ‘नगरपंचायतीने विकास निधीतून आवश्यक कामे करावीत. या कामासाठी आमदार, खासदार तसेच पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातूनही निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत,’ असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
-----