
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला पराभूत केलं आणि जेतेपदावर नाव कोरलं. या स्पर्धेची सांगता झाल्यानंतर आयसीसीने स्पर्धेतील सर्वोत्तम 11 खेळाडूंची निवड केली आहे. या संघात भारताच्या 4 खेळाडूंनी जागा मिळाली आहे. पण अंतिम फेरीत उपविजेते पदावर समाधान मानावं लागलेल्या न्यूझीलंडचा एकही खेळाडू या संघात नाही. इतकंच काय तर टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात सर्वात वेगवान शतक ठोकणाऱ्या फिन एलेन यालाही संघातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. इतकंच काय तर झिम्बाब्वेचा तरूण ब्रायन बेनेट याचाही या संघात समावेश केलेला नाही. या स्पर्धेत त्याने 146 च्या सरासरीने 292 धावा केल्या होत्या. दुसरीकडे, अमेरिकेच्या शॅडले वॅन शॅकविक याला 12 वा खेळाडू म्हणून स्थान मिळालं आहे. चला जाणून घेऊयात या संघात कोणाला संधी मिळाली आहे.
आयसीसीने निवडलेल्या संघात पाकिस्तानचा साहिबजादा फरहान हा संजू सॅमसनसह ओपनिंगला येईल. फरहानने टी20 वर्ल्डकपच्या सामन्यात 76.60 च्या सरासरीने 383 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 160 पेक्षा अधिकचा होता. संजू सॅमसनबाबत जास्त काही सांगण्याची गरज नाही. त्याने फक्त 5 सामन्यात 80.25 च्या सरासरीने 321 धावा केल्या आहेत. इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर असेल. त्याने या स्पर्धेतील 9 सामन्यात 192.29 च्या स्ट्राईक रेटने 317 धावा केल्यात. एडन मार्करमने 9 सामन्यात 286 धावा केल्या असून त्याच्याकडे कर्णधारपद सोपवलं आहे.
Presenting the #T20WorldCup 2026 Team of the Tournament
More https://t.co/b4x8qMPUL1 pic.twitter.com/NGInFcYa7S
— ICC (@ICC) March 9, 2026
अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या पाचव्या स्थानी आहे. त्याने 9 सामन्यात 217 धावा आणि 9 विकेट घेतल्या आहेत इंग्लंडचा विल जॅक्स सहाव्या स्थानी असून त्याने 8 सामन्यात 226 धावा आणि 9 विकेट घेतल्या आहेत. जेसन होल्डर सातव्या स्थानी असून त्याने 10 विकेटसह 141 धावा केल्या आहेत.
या संघाच्या गोलंदाजीचा धुरा जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर आहे. बुमराह आठव्या स्थानी असून 6.21 च्या इकोनॉमी रेटने 14 विकेट घेतल्या आहेत. लुंगी एनगिडी नवव्या स्थानी, इंग्लंडचा फिरकीपटू आदिल राशीद दहाव्या स्थानी, तर झिम्बाब्वेचा ब्लेसिंग मुजरबानी यांची प्लेइंग 11 मध्ये निवड केली आहे. तर 12 वा खेळाडू म्हणून अमेरिकेच्या शॅडले वॅन शॅकविक याची निवड केली आहे.