भारत एलपीजी सिलेंडर बातम्या: सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यातील व्यत्यय आणि एलपीजी (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) पुरवठ्यातील निर्बंध लक्षात घेता, मंत्रालयाने (Ministry of Petroleum) तेल रिफायनरीजना अधिक एलपीजी (LPG Crisis) उत्पादन करण्याचे आणि त्या अतिरिक्त उत्पादनाचा वापर घरगुती एलपीजीसाठी करण्याचे आदेश जारी केले आहेत. मंत्रालयाने घरगुती एलपीजी पुरवठ्याला घरगुती ग्राहकांना प्राधान्य दिले असून, साठेबाजी आणि काळ्या बाजाराला रोखण्यासाठी 25 दिवसांचा इंटर-बुकिंग कालावधी सुरू केला आहे. (Ministry of Petroleum on LPG Crisis)
दरम्यानआयातित एलपीजी पासून होणाऱ्या नॉन-डोमेस्टिक पुरवठ्याला रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांसारख्या आवश्यक नॉन-डोमेस्टिक क्षेत्रांना प्राधान्य देण्यात येत आहे. अशी माहिती देत पेट्रोलियम मंत्रालयाचे गॅस पुरवठ्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
India LPG Cylinder : नॉन-डोमेस्टिक क्षेत्रांसाठीच्या तीन कार्यकारी संचालकांची समिती गठीत
पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या इराण-इस्त्रायलच्या संघर्षाचा फटका आता भारताला बसत असल्याचं दिसून येतंय. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एलपीजी सिलेंडरबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने घरगुती एलपीजी सिलेंडरच्या बुकिंगमधील अंतर 21 दिवसांवरून वाढवून 25 दिवस इतके केले आहे. त्यामुळे ग्राहकांना आता एक गॅस बुकिंग केल्यापासून 24 दिवसांनी दुसरा गॅस बुकिंग करता येणार आहे. असं असताना घरगुती गॅस वापरला सरकारद्वारे प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णालय, शिक्षणसंस्था यांनाही प्राधान्याने गॅस पुरवठा करावा, शिवाय हॉटेल आणि कंपनी अशा क्षेत्राकडून आलेल्या विनंतीवर विचार करण्यासाठी समितीची देखील स्थापनानाही करण्यात आली आहे. दरम्यानइतर नॉन-डोमेस्टिक क्षेत्रांसाठी (रेस्टॉरंट्स/हॉटेल्स/इतर उद्योग) एलपीजी पुरवठ्यासाठी, ऑइल मार्केटिंग कंपनीच्या तीन कार्यकारी संचालकांची (Executive Directors) एक समितीची स्थापन करण्यात आली आहे. हि समिती या क्षेत्रांकडून आलेल्या विनंत्यांचे पुनरावलोकन करेल. अशी माहितीहे पेट्रोलियम मंत्रालयकडून देण्यात आली आहे.
एलपीजी संकटावर पेट्रोलियम मंत्रालयः एलपीजी सिलिंडरबाबत सरकार म्हणणं काय?
सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की रेस्टॉरंट उद्योगाला व्यावसायिक एलपीजी सिलिंडर पुरवण्यावर कोणतीही बंदी नाही, परंतु प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी दिसते. अनेक गॅस पुरवठादार व्यावसायिक सिलिंडर पुरवण्यास असमर्थता व्यक्त करत आहेत, ज्यामुळे रेस्टॉरंट आणि हॉटेल व्यवसायांना अडचणी येत आहेत. मंत्रालयाने घरगुती एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य दिले आहे आणि साठवणूक आणि काळाबाजार रोखण्यासाठी 25 दिवसांचा इंटर-बुकिंग कालावधी सुरू केला आहे. रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांसारख्या अत्यावश्यक बिगर-देशांतर्गत क्षेत्रांसाठी आयात केलेल्या एलपीजीच्या बिगर-देशांतर्गत पुरवठ्याला प्राधान्य दिले जात आहे. इतर बिगर-देशांतर्गत क्षेत्रांना एलपीजी पुरवठ्याबाबत, रेस्टॉरंट्स/हॉटेल/इतर उद्योगांना एलपीजी पुरवठ्यासाठी प्राप्त झालेल्या निवेदनांचा आढावा घेण्यासाठी ओएमसीकडून तीन कार्यकारी अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
आणखी वाचा