भारत सरकारच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, भारत-बांगलादेश मैत्री पाईपलाईन २०१७ मध्ये कार्यान्वित झाली. ती नुमालीगड रिफायनरी लिमिटेडकडून बांगलादेशला व्यावसायिक आधारावर डिझेल पुरवत आहे. हा डिझेल पुरवठा दोन्ही देशांमधील नियमित चालू असलेल्या ऊर्जा व्यापाराचा एक भाग आहे. भारतातील इंधन उपलब्धतेवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
Mandal 2.0: यूजीसी नियमन २०२६ लागू करण्याची मागणी करत मशाल रॅली काढली'मंडल २.०' च्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आणि लोकांनी आज पटना येथे यूजीसी नियमन २०२६ लागू करण्याची मागणी करत मशाल रॅली काढली. त्यांनी बिहारमध्ये एससी, एसटी, ओबीसींसाठी ६५% आरक्षणाची मागणीही केली.
PNG Crisis: हॉटेल चालकांना गॅसचा तुटवडातुटवडा जाणवत असल्यामुळे हॉटेल करणार बंद
गॅस तुटवडा असल्यामुळे हॉटेल चालकांना गॅस ब्लॅक ने मिळवण्यासाठी मोठ्या गॅस साठी मोजावे लागत आहेत 4000 हजार रुपये
आहार संघटनेकडून या संदर्भात दखल घेऊन योग्य ती पाऊले उचलण्याची मागणी
Mumbai News: मुंबईच्या दहिसर रावलपाडा परिसरात मोठा अपघातदहिसर पूर्वेतील रावलपाडा परिसरात रेती कंपाउंड परिसरात भरधाव ट्रक ने तिघांना चिराडल्याच्या धक्कादायक घटना घडली आहे.
Pune Live: बनावट सोन्याची बिस्किटे दाखवून महिलांची फसवणूकपुणे: बनावट सोन्याची बिस्किटे दाखवून ज्येष्ठ महिलांची फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. आरोपीकडून १२ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी मूळचा लातूर जिल्ह्यातील जळकोट येथील असून, त्याच्याविरुद्ध पुण्यासह लातूर, कराड शहरातील पोलिस ठाण्यांत अपहरण, अत्याचार आणि फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
उमरगा शहराजवळ अपघात, दोघांचा मृत्यूउमरगा (जि धाराशिव) : भरधाव वेगाने निघालेली कार राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या छोटेखानी चहाच्या हॉटेलमध्ये घुसल्याने दोघांचा मृत्यु झाला तर दोघे जखमी झाले आहेत. उमरगा ते जकेकुर- चौरस्ता दरम्यान नॅशनल टायर्सच्या दुकानासमोर मंगळवारी (ता.१०) दुपारी अडीचच्या सुमारास हा अपघात झाला.
Mumbai Live: लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी, एकाला अटकलॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देत खंडणी मागणाऱ्या आरोपीला मालाड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी फिरोज ओमप्रकाश अग्रवाल (वय २८) याला दिल्ली येथील संगम विहार परिसरातून ताब्यात घेण्यात आले. तक्रारदार बाबुलाल महावलाल अग्रवाल (४५) यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅप कॉल व मेसेज करून लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने पैशांची मागणी करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी मालाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने आरोपीला २५ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून पुढील तपास मालाड पोलिस करत आहेत.
Mumbai Live : राज्यात लवकरच मेगा पदभरती; मुख्यमंत्री फडणवीसांकडून मान्यताराज्यात लवकरच मेगा पदभरती होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या पदभरतीला मान्यता देण्यात आली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत घोषणा केली. ५ हजार ४१२ प्राध्यापकांची जून महिन्यापूर्वी पदभरतीतून नेमणूक केली जाणार आहे.
Kolhapur Live : कोल्हापुरात गॅस सिलेंडरसाठी रांगा पण घाबरून न जाण्याचे अधिकाऱ्यांचे आवाहनसध्या गॅस सिलेंडर बुकिंग 21 दिवसांवरून 25 दिवसांवर करण्यात आलं असून किंमतही 60 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस मिळेल की नाही याची शाश्वती नसल्याने अनेक नागरिक कोल्हापुरात लांबच लांब रांगा लावून बुकिंग करत आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर साठेबाजी टाळण्यासाठी पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे. "जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. गरज असल्यासच गॅस सिलिंडर बुकिंग करावे. व्यावसायिक गॅसवर तात्पुरते निर्बंध आणले आहेत."
Nashik Live : युद्धाचा फटका आता थेट उद्योग क्षेत्राला- युद्धाचा फटका आता थेट उद्योग क्षेत्राला
- गॅस टंचाईने नाशिकमधील उद्योग अडचणीत
- ४०० हून अधिक कंपन्या बंद पडण्याच्या उंबरठ्यावर
- अनेक कंपन्यांकडे फक्त उरला १ दिवसाचा साठा, पुरवठा न झाल्यास कंपन्या बंद ठेवण्याची वेळ
- कंपन्या बंद झाल्यास उद्योग जगताला कोट्यावधींचा फटका बसण्याची शक्यता
- अनेक कंपन्यांना गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीनं पुरवठ्यावर निर्बंध लादण्याची दिली सूचना
- कंपन्या बंद झाल्यास ऑटोमोबाईलसह अन्य मोठ्या कंपन्यांच्या उत्पादनावर देखील परिणाम होण्याची शक्यता
Yavatmal Live : व्यावसायिक गॅस टंचाई; हॉटेलचालकांना लाकडाच्या भट्टीवर स्वयंपाक करण्याची वेळअमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम जगभरासह राज्यातही जाणवू लागला आहे. यवतमाळमध्ये व्यावसायिक गॅसचा पुरवठा मागील तीन दिवसांपासून बंद असल्याने हॉटेल व्यावसायिकांवर मोठा परिणाम झाला आहे. गॅसचा साठा संपल्यामुळे काही हॉटेलचालकांना लाकडाच्या भट्टीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली असून, अनेकांना हॉटेल बंद करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
Live : उष्णतेमुळे वकिलांना दिलासा; १ मार्च ते ३० जून काळा कोट घालणे बंधनकारक नाहीउन्हाळ्यातील तीव्र उष्णतेचा विचार करून वकिलांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. १ मार्च ते ३० जून या कालावधीत वकिलांना काळा कोट न घालता न्यायालयीन कामकाज करण्यास परवानगी देण्यात आली आहे. उष्णतेमुळे काळा कोट परिधान करून काम करताना अडचणी येत असल्याने ही सवलत देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याबाबत ज्येष्ठ वकील निलेश आंधळे यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Nashik Live : नाशिक-नगरच्या कांद्याला मॉरिशसची बाजारपेठ; १ लाख टन निर्यातीची घोषणाराज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नाशिक आणि नगर जिल्ह्यातील कांद्याला आता मॉरिशसची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. सुमारे १ लाख टनांपेक्षा जास्त कांद्याची निर्यात मॉरिशसला करण्यात येणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत दिली.
Mumbai Live : मुंबईच्या ओशिवरा परिसरात झोपडपट्टीला मोठी आगओशिवरा एस व्ही रोडवरील ए वन दरबार हॉटेलच्या मागील झोपडपट्टीत मोठी आग लागली आणि तीन ते चार झोपड्या आगीत जळून खाक झाल्या. आगीची माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. आगीत अडकलेल्या नागरिकांना तात्काळ बाहेर काढण्यात आले. झोपडपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक आणि बांबू असल्यामुळे आग वाढण्याची शक्यता होती.
व्यावसायिकांना गॅस सिलेंडर बंद झाल्याने हॉटेल चालकाने चुलीवर स्वयंपाक करण्यास केली सुरुवातअमेरिका, इराण, इराक या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम धुळ्याच्या शिरपूर येथील हॉटेल व्यावसायिकांवर होत आहे. या युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम जाणवत असून, हॉटेल व्यावसायिकांना गॅसचा पुरवठा कालपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायासाठी आवश्यक असलेला गॅस सिलेंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यावसायिकांना हॉटेल बंद करण्याची वेळ आली आहे.
Wardha Live : वर्धा बाजार समितीत शेतमाल ठेवण्यावरून निर्माण झाला वादगहू, चणा आणि तूर यांची आवक वाढल्यामुळे शेतमाल ठेवण्यासाठी जागेची समस्या निर्माण झाली आहे, कारण शेडमध्ये आधीच व्यापाऱ्यांचा माल आहे. या गोंधळाच्या स्थितीवर सभापती अमित गावंडे यांनी ठाम भूमिका घेतली आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी जागा मोकळी करण्याचे निर्देश दिले आहेत. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवक वाढल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये वाद झाला आहे. सभापती अमित गावंडे यांनी व्यापाऱ्यांचा माल शेडमधून खाली करून शेतकऱ्यांच्या मालासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.
Sangli Live: विविध मागण्यांसाठी कवठेमहांकाळमध्ये सुशिक्षित बेरोजगारांनी काढला गाढव मोर्चाविविध मागण्यांसाठी कवठेमहांकाळमध्ये सुशिक्षित बेरोजगारांनी काढला गाढव मोर्चा...
बेरोजगारी,शेती व पिण्याचा पाण्याचा प्रश्न, शैक्षणिक आरोग्य समस्यासह विविध मागण्यांसाठी सांगलीच्या कवठेमंकाळमध्ये गाढव मोर्चा काढण्यात आला.
कवठेमहांकाळ तालुक्यातल्या बेरोजगार तरुणांनी एकत्रित येत तहसील कार्यालयावर थेट गाढव घेऊन मोर्चा काढत प्रशासन व लोकप्रतिनिधींचा निषेध नोंदवला आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यातील हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध नाही, त्यामुळे एमआयडीसी निर्मिती करावी, बंद पडलेला साखर कारखाना पुन्हा सुरू करावा, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील तलाव भरून घ्यावेत, अशा मागण्या करण्यात आल्या.
Solapur Live: सोलापुरात घरगुती गॅस ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करताना तांत्रिक अडचणीसोलापुरात घरगुती गॅस ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करताना तांत्रिक अडचणी
ऑनलाईन गॅस बुकिंग होतं नसल्याने ग्राहक सिलेंडर घेऊन थेट एजन्सीला येतायत
मात्र दिवसाचा कोटा सकाळीच संपल्याने गॅस एजन्सीच्या गोडाऊनमधून देखील ग्राहकांना गॅस मिळतं नाहीये
एकीकडे शासन गॅसचा मुबलक साठा असून घाबरण्याचे गरज नाही म्हणतंय मग आम्हाला गॅस मिळतं का नाही असा सवाल ग्राहक उपस्थित करतायत
तर दुसरीकडे ग्राहकांनी एजन्सीला येऊ नये, गॅस घरपोच दिले जाईल असे आश्वासन एजन्सीतर्फे दिलं जातंय
Kolhapur News : व्यावसायिक गॅसचा तुटवडा, उद्योगांवर संकटकोल्हापूर - राज्यात कमर्शियल गॅसचा तुटवडा अनेक उद्योगांवर आले संकट केटरिंग हॉटेल व्यवसायिकांसह विद्यार्थ्यांना भोजन पुरवणाऱ्या संस्था ही अडचणीत विद्यार्थ्यांना दुपारचं जेवण करण्यासाठी गॅस उपलब्ध नसल्याने व्यावसायिकांवर नवे संकट केंद्र आणि राज्य सरकारने शाळांच्या किचनला गॅस पुरवठा त्वरित करावा अशी मागणी
Solapur : सोलापुरात इंधन तुटवडा भासणार नाही; प्रशासनाची माहितीसोलापूर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा गॅस, पेट्रोल, डिझेलचा तुतवाडा निर्माण होणार नाही यासाठी जिल्हा पुरवठा प्रशासन सज्ज युद्धजन्य परिस्थितीत प्रशासनाकडून घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी 'फिरते पथक' करण्यात आले स्थापन सोलापूर जिल्ह्यात एकूण 94 गॅस एजेंसी असून त्या सर्व एजन्सीला जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत सूचना..
Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीसमोर सभापती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा वादछत्रपती संभाजीनगर पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी बारा वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीसमोर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. या ठिकाणी भाजप आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात तीव्र वाद निर्माण झाला असून माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप केले आहेत.
Mumbai News: महानगर गॅसच्या नावाखाली नागरिकाची 4 लाख 18 हजार रुपयांची फसवणूकमहानगर गॅसच्या नावाखाली फसवणुकीचं सत्र सुरूच
बोरीवलीत 36 वर्षीय नागरिकाची फसवणूक
गॅस बिल थकित असल्याचा मेसेज पाठवून गॅस कनेक्शन बंद करण्याची दाखवली भीती
gas_bill_update.apk नावाची फाईल पाठवून लुटलं
फाईल ओपन करताच बँकेतून पैसे वजा
तब्बल 4 लाख 18 हजार रुपयांची फसवणूक
अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल
Mumbai News: मुंबईत क्रिप्टो गुंतवणूक योजनेच्या नावाखाली 6.50 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा भंडाफोडमुंबईतील दहिसर पोलिसांनी ‘BitxStaking.com’ या क्रिप्टो गुंतवणूक योजनेच्या नावाखाली झालेल्या सुमारे 6.50 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा भंडाफोड केला आहे. या प्रकरणी सुजीत शंकरराव जाधव (48, रा. सातारा) या मुख्य आरोपीला अहमदाबाद विमानतळावरून अटक करण्यात आली असून तो थायलंडला पळून जाण्याच्या तयारीत होता. आरोपीने SJAB Digital Solution LLP या कंपनीच्या नावाने जास्त परताव्याचे आमिष दाखवत सुमारे 2000 गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढले. विशेष म्हणजे फक्त दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या आरोपीने मोबाईल आणि यूट्यूबच्या मदतीने हे सॉफ्टवेअर तयार केले, अशी माहिती तपासात समोर आली आहे. ठगीच्या पैशातून अहमदाबादमध्ये खरेदी केलेली मालमत्ता पोलिसांनी जप्त केली असून इतर 8 फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
Jalgaon News: भुसावळ बसस्थानक उपहारगृहांवर गॅस टंचाईचे संकटजळगाव जिल्ह्यातील भुसावळ बसस्थानक परिसरातील उपहारगृहांवर गॅस टंचाईचे संकट ओढवले आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस एजन्सीकडून व्यवसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद करण्यात आल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. बसस्थानकावरील उपहारगृहांमध्ये प्रवाशांसाठी नाश्ता व जेवण बनवण्यासाठी दररोज तीन ते चार व्यवसायिक गॅस सिलेंडर लागतात. मात्र सध्या गॅस एजन्सीकडून व्यवसायिक सिलेंडरचा पुरवठा थांबवण्यात आल्याने हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.
Nanded News: टोमॅटोचे भाव कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात, टोमॅटो फेकून रस्त्यावर लाल चिखलशेतीमालाला भाव नाही, टोमॅटो उत्पादक शेतकरी तर सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र नांदेड मध्ये पहावयास मिळत आहे. टोमॅटो लागवडीचा खर्चही निघत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याने अक्षरशः टोमॅटो रस्त्यावर फेकून त्याचा लाल चिखल केला आहे. शेतकऱ्याचा टोमॅटो कोणी फुकटही घेऊन जात नाहीय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. किरकोळ बाजारात पाच ते दहा रुपये किलो टोमॅटो विक्री होत आहे. टोमॅटो तोडणीचा खर्च देखील परवडत नसल्याने आणि व्यापारी देखील टोमॅटो घेऊन जात नसल्याने शेतकऱ्यांनी नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील लहान येथे टोमॅटो रस्त्यावर फेकून त्याचा लाल चिखल केला आहे. याचाच आढावा घेतला आहे आणि शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांनी.
Mumbai News: युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, मुंबईत भाजीपाला स्वस्तयुद्धजन्य परिस्थितीमुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे मुंबईत भाजीपाला स्वस्त असल्याची माहिती आहे.
Mumbai Live : एलपीजी (LPG) गॅसच्या तुटवड्याचा हॉटेल व्यवसायावर परिणाममुंबईत एलपीजी (LPG) गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून व्यावसायिकांनी सरकारने यावर तोडगा काढावा अशी विनंती केली आहे.
Delhi Live : केंद्र सरकारने 'अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५' लागू केलाभारत सरकारने पेट्रोलियम, पेट्रोलियम उत्पादने आणि गॅस यांची उपलब्धता, पुरवठा आणि समन्यायी वितरण नियंत्रित करण्यासाठी 'अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५' लागू केला आहे.
Rahul Gandhi Live : शेतकरी कुटुंबातील लग्नाला उपस्थित राहण्यासाठी राहुल गांधी सोनीपतमध्ये दाखललोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवारी हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील 'मदिना' गावात, एका शेतकऱ्याच्या कुटुंबातील लग्नाला उपस्थित राहण्यासाठी पोहोचले, अशी माहिती सूत्रांनी दिली. ते सकाळीच या गावात दाखल झाले.
Kolhapur Live : इराण–इस्रायल तणावाचा परिणाम? कोल्हापुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगाइराण–इस्रायलमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात इंधन आणि गॅस पुरवठ्याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात घरगुती गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी शहरातील अनेक गॅस एजन्सींच्या बाहेर सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
Badlapur Live : कुळगाव-बदलापूर नगरपालिकेचा 1098 कोटींचा अर्थसंकल्प सादर; करवाढ नाहीकुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल १०९८ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. नगराध्यक्षा रूचिता घोरपडे यांनी हे बजेट सादर करताना ११.७६ लाख रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प मांडला. विशेष म्हणजे या अर्थसंकल्पात नागरिकांवर कोणतीही करवाढ प्रस्तावित करण्यात आलेली नाही, त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
Live : आखाती तणावाचा परिणाम; हॉटेल व्यवसायिकांना गॅस सिलेंडरचा तुटवडाआखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम हॉटेल व्यवसायावर
गॅस एजन्सी ना मिळणारा पुरवठा व्यवसायिक सिलेंडरचा पुरवठा निम्म्यावर
कालच्या दिवसांपर्यंत हॉटेल व्यवसायिकांना मिळणाऱ्या व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा होता सुरळीत
आता मात्र व्यावसायिक सिलेंडरची कमतरता, त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांच्या गॅस सिलेंडर पुरवठा निम्म्यावर
रत्नागिरी शहरातील प्रत्येक गॅस एजन्सीला अवघ्या 60 ते 70 व्यवसायिक सिलेंडरचा दिला जातोय कोटा
Nashik Live : स्वीकृत नगरसेवक पदासाठी एक वर्षाचा फॉर्म्युला; भाजप-शिंदे सेनेत मोठी स्पर्धानाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदांसाठी मोठ्या प्रमाणात इच्छुक असल्याने भाजप आणि शिंदे सेनेकडून एक वर्षाचा कालावधी देण्याचा फॉर्म्युला चर्चेत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महापालिकेत भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्याने स्वीकृत नगरसेवक पदाच्या सहा जागा भाजपच्या वाट्याला येणार असून या जागांसाठी तब्बल पाचशे जणांनी अर्ज केल्याची माहिती आहे. त्यामुळे जास्तीत जास्त इच्छुकांना संधी देण्यासाठी एक वर्षाचा कालावधी देण्याचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान शिंदे यांच्या शिवसेनेकडे दोन जागा जाणार असून ठाकरे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे प्रत्येकी एक जागा राहणार असल्याचीही चर्चा आहे.
Chhatrapati Sambhajinagar Live : वाळुज एमआयडीसीतील उद्योगांवर गॅस टंचाईचा परिणामआज दुपारपासून छत्रपती संभाजीनगरमधील वाळुज एमआयडीसी परिसरातील उद्योगांवर गॅस टंचाईचा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. गॅस पुरवठा कमी झाल्यामुळे काही कंपन्यांचे उत्पादन आज दुपारपासून थांबण्याची स्थिती निर्माण झाली आहे. काही उद्योगांकडे मर्यादित साठा उपलब्ध असल्यामुळे ते उद्यापर्यंत उत्पादन सुरू ठेवू शकतात, मात्र साठा संपल्यास त्या उद्योगांनाही उत्पादन बंद करावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे औद्योगिक परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Kudal: कुडाळच्या पिंगुळी बाजारपेठेत बनावट भांडी विक्रीचा पर्दाफाशKudal: कुडाळच्या पिंगुळी बाजारपेठेत बनावट भांडी विक्रीचा पर्दाफाश
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये परप्रांतीय विक्रेत्यांकडून बनावट भांडी विक्री व्यवसाय होत असल्याचे आढळून आले आहे. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी बाजारपेठमध्ये याचा पर्दाफाश करण्यात आला. या विक्रेत्यांकडून विक्री केली जाणारी भांडी बनावट असल्याचे निदर्शनास आले. ही भांडी १०० रूपये एक नग अशी विक्री होत असून सामान्य नागरिक ही कमी किमतीत असल्याने खरेदी करीत आहे. ही भांडी पत्र्याची असून त्याला लोहचुंबक चिकटत असल्याचे दिसून येते. हा पत्रा निकृष्ट दर्जाचा असून काही नागरिकांनी भांडी विकत नेऊन त्यांचा वापर केला तर ती काळी पडली. हे विक्रते दिल्ली येथील असून या विक्रेत्यांकडे कोणताही व्यवसाय परवाना नाही. तसेच यांच्याकडील चारचाकी वाहनाचा परवाना नाही. या प्रकरणी कुडाळ पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
क्रिप्टो गुंतवणूक योजनेच्या नावाखाली झालेल्या सुमारे 6.50 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा भंडाफोडक्रिप्टो गुंतवणूक योजनेच्या नावाखाली झालेल्या सुमारे 6.50 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा भंडाफोड
मुंबईतील दहिसर पोलिसांनी ‘BitxStaking.com’ या क्रिप्टो गुंतवणूक योजनेच्या नावाखाली झालेल्या सुमारे 6.50 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा भंडाफोड केला आहे. या प्रकरणी सुजीत शंकरराव जाधव (48, रा. सातारा) या मुख्य आरोपीला अहमदाबाद विमानतळावरून अटक करण्यात आली असून तो थायलंडला पळून जाण्याच्या तयारीत होता. आरोपीने SJAB Digital Solution LLP या कंपनीच्या नावाने जास्त परताव्याचे आमिष दाखवत सुमारे 2000 गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढले. विशेष म्हणजे फक्त दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या आरोपीने मोबाईल आणि यूट्यूबच्या मदतीने हे सॉफ्टवेअर तयार केले, अशी माहिती तपासात समोर आली आहे. ठगीच्या पैशातून अहमदाबादमध्ये खरेदी केलेली मालमत्ता पोलिसांनी जप्त केली असून इतर 8 फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
नाशिकच्या रामकुंडात चपला आणि कपडे फेकाफेकी प्रकरणावर गुन्हा दाखलनाशिकच्या रामकुंडात चपला आणि कपडे फेकाफेकी प्रकरणावर गुन्हा दाखल
- नाशिकच्या रामकुंडात चपला आणि कपडे फेकाफेकीनंतर पंचवटी पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल
- रंगपंचमीच्या दिवशी सायंकाळी हुल्लडबाजांनी रामकुंडात चपला फेकल्याने पुरोहित संघाने धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी पोलिसांत दाखल केली होती तक्रार
- गोदावरी प्रेमी,नाशिककर आणि पुरोहित संघाच्या तक्रारीनंतर पोलिसात गुन्हा दाखल
- धार्मिक भावना आणि गंगा गोदावरी तसच रामकुंड ह्या पवित्र स्थळावर हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाईची सर्व स्तरातून करण्यात आली होती मागणी
‘शांत पश्चिम आशिया हा भारताच्या हिताचा’Latest Marathi Live Updates 10 march 2026 : पश्चिम आशिया हा आपल्या शेजारील प्रदेश आहे आणि तो स्थिर व शांत राहणे भारताच्या हिताचे आहे. तेथील संघर्षाचा भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो. सर्व जोखीम लक्षात घेऊन केंद्र सरकार परिस्थिती हाताळत आहे,’ अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी इराण विरुद्ध अमेरिका-इस्राईल संघर्षावर संसदेत भारत सरकारची भूमिका मांडली. संघर्षग्रस्त आखातातून आतापर्यंत ६७ हजार भारतीय परतले असल्याचे ते म्हणाले. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...