सातारा : खटाव येथील शहाजीराजे महाविद्यालयातील प्राध्यापक पदोन्नतीच्या कामासाठी तीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. तर या प्रकरणात संस्थेचे अध्यक्ष आणि ग्रंथालय परिचर अशा दोन लोकसेवकांनाही ताब्यात घेण्यात आले.
Teacher Promotion:टीईटी पात्र शिक्षकांचीच पदोन्नती! गुरुजींच्या संघटनांमध्ये मतभेद, अपात्र नेत्यांचा प्रशासनावर दबाव..पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शहाजीराजे महाविद्यालय, खटाव येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना प्राध्यापक पदावर पदोन्नती देण्यासाठी समितीचे अध्यक्ष म्हणून शिवाजी विद्यापीठात उपस्थित राहणे किंवा प्रतिनिधी नियुक्तीचे पत्र देण्यासाठी रवींद्र गणपत पवार (रा. खटाव) या खासगी इसमाने तीन लाख रुपयांची लाच मागितली.
ही रक्कम खटावच्या चंद्रहार पाटील ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अजित रामचंद्र पाटील यांच्यासाठी मागितल्याचे सांगण्यात आले. या मागणीस ग्रंथालय परिचर अनिल सदाशिव गुजर यांनीही प्रोत्साहन दिल्याचे पडताळणीत स्पष्ट झाले. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे मंगळवारी पवार यांनी तीन लाख रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वीकारताच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
UPSC Success Story: वॉचमनच्या मुलाची ‘यूपीएससीत’ भरारी; आईचे किराणा दुकान अन् वडिलांचा पालिकेत पहारा, मुलाने यशाला गवसणी घालून फेडले पांग!या कारवाईनंतर अजित पाटील आणि अनिल गुजर यांनाही ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी तिघांविरुद्ध पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती. ही कारवाई पोलिस निरीक्षक सुप्रिया गावडे, पोलिस हवालदार गणेश ताटे, नीलेश राजपुरे, महिला पोलिस नाईक प्रियांका जाधव आणि कॉन्स्टेबल अजयराज देशमुख यांच्या पथकाने केली. या कारवाईचे पर्यवेक्षण पोलिस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांनी केले. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अर्जुन भोसले यांनी मार्गदर्शन केले.