Maharashtra Live News Update : सिलिंडरचा काळाबाजर रोखण्यासाठी सरकारकडून उपाययोजना
Saam TV March 11, 2026 11:45 AM
Dharashiv: शासकीय वाहन, जीवनावश्यक सेवा यांच्यासाठी पेट्रोल डिझेलचा साठा राखीव ठेवण्याचे आदेश

धाराशिव जिल्ह्यात शासकीय वाहन, जीवनावश्यक सेवा यांच्यासाठी पेट्रोल डिझेलचा साठा राखीव ठेवण्याचे आदेश

युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून पेट्रोलपंप चालकांना प्रतिबंधात्मक आदेश

तसेच पेट्रोल पंपावर कॅन मध्ये सुटे पेट्रोल, डिझेल देण्यास बंदी; सुट्टे पेट्रोल डिझेल देणाऱ्यांवर कारवाई होणार

युद्धाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या अफवांमुळे साठेबाजी रोखण्यासाठी निर्णय

शेतीकामासाठी कॅनमध्ये सुट्टे डिझेल घेऊन जाणारे ट्रॅक्टर धारकांना निर्णयाचा फटका बसणार

ट्रॅक्टरच्या इंधनाच्या टाकीतच डिझेल दिले जाणार, पुरवठा विभागाने केल स्पष्ट

शेती मशागतीच्या कामांना ब्रेक , ट्रॅक्टर घेऊनच पेट्रोल पंपावर जावं लागणार

आंदेगाव येथे अवैध देशी दारू विरोधात गावकरी आक्रमक

नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील आंदेगाव येथे अवैध देशी दारू विरोधात गावकरी आक्रमक झाले आहेत. आंदेगाव येथे अनेक वर्षापासून अवैध देशी दारू विक्री सुरू आहे. या अवैध देशी दारू मुळे गावातील अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.परिणामी लहान वयात त मुलांना या देशी दारूचे व्यसन लागत आहे. गावात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याने गावकरी त्रस्त झाले होते.अखेर गावकऱ्यांनी एकत्र येत पोलिसांसमोरच अवैध देशी दारू विकणाऱ्यांवर धाड टाकली. पोलिसांना अवैध देशी दारू विकत असल्याचे गावकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. गावातील अवैध देशी दारू तात्काळ बंद करण्यात यावी या मागणीसाठी गावकरी आक्रमक झाले होते.

Vidarbha: विदर्भावर अवकाळी पावसाचे संकट

नागपूरसह विदर्भात उन्हाचे तीव्र चटके बसत असतानाच पुन्हा एकदा विदर्भावर अवकाळी पावसाचे संकट

विदर्भात अवकाळी पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होत असून 14 आणि 15 मार्चला वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

नागपूर वेधशाळेने व्यक्त केला अंदाज....

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून तो उत्तरेकडे सरकण्याची शक्यता त्याचा थोडाफार प्रभाव विदर्भ आणि मध्य भारतावर पडून विज आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे...

सध्या नागरिक ऊन आणि उकाडापासून त्रस्त असून या पासून काही अंशी आठवड्याच्या अखेरीस दिलासा मिळण्याची शक्यता

नागपूर जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, सीएनजी, LPG चा पुरेसा साठा,जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

नागपूर जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, सीएनजी, LPG चा पुरेसासाठा नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

नागपूर जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी वृत्तपत्र मध्ये जाहिरात देऊन केला खुलासा

पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजीचा पुरेसासाठा उपलब्ध असून नियमित आणि सुरळीत पुरवठा करण्यात येण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचा आश्वासन

दर महिन्याला मिळणाऱ्या सिलेंडरची मर्यादा पंधरा दिवसांवरून 25 दिवसांवर करण्यात आल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

नागरिकांनी अनावश्यक पंपावर गर्दी टाळावी अफांवर विश्वास न ठेवण्याचा जिल्हाधिकारी यांचा आवाहन....

कळंब शहरात दोन गटांत तुफान दगडफेक; १० हून अधिक जखमी

धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर तुफान दगडफेक आणि हाणामारीत झाल्याची घटना समोर आली आहे.छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात राञी दहा च्या दरम्यान हा प्रकार घडला असून या घटनेत दहा हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद काही वेळातच चिघळला आणि दोन्ही गटांतील तरुण आमने सामने येत एकमेकांवर दगडफेक करू लागले. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ एका नागरिकाने आपल्या मोबाईल कॅमेरा कैद केला आहे. मागील काही दिवसांपूर्वी कळंब शहरातील भर चौकात दोन राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यात जोरदार राडा पहिला मिळाला होता त्यानंतर पुन्हा एकदा हा प्रकार घडल्याने पोलीस नेमकं काय करतात?असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आज होणार रायगडमधील 15 पंचायत समितीवर सभापती पदांची निवड

आज पंचायत समितीवर निवडून गेलेल्या सदस्यांची सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. रायगडमध्ये पंचायत समितीच्या 118 सदस्य पदांच्या जागांसाठी निवडणूक पार पडली होती. यामध्ये सर्वाधिक 37 जागा शिंदे शिवसेनेला मिळाल्या आहेत तर भाजप 34 आणि अजित दादांच्या राष्ट्रवादीने 31 जागांवर विजय मिळवला आहे. निवडून आलेले हे पंचायत समिती सदस्य आज निवडणुक प्रक्रियेने सभापतीची निवड करणार आहेत. जिल्ह्यातील राजकिय परिस्थितीनुसार शिंदे सेना 6 ठिकाणी, राष्ट्रवादी 5 ठिकाणी तर भाजपला 3 ठिकाणी सभापती पद मिळण्याची शक्यता आहे.

Maharashtra Live News Update : सिलिंडरचा काळाबाजर रोखण्यासाठी सरकारकडून उपाययोजना

युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा तुटवडा निर्माण होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसचा पुरवठा सुरू ठेवण्याबरोबरच याचा अवैध्य वापर रोखण्यासाठी दक्षता घेण्यासाठी स्थापना करण्यात आली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.