नागपूर: जन्माला आलेले बाळ अवघ्या ७०० ग्रॅम वजनाचे होते. हृदयासह फुफ्फुस आणि मेंदूचा पूर्णपणे विकास झाला नव्हता. मेडिकलच्या बालरोग विभागातील डॉक्टरांनी बाळाला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवत कृत्रिम श्वास देत हळूहळू नियतीवर विजय मिळवत चिमुकल्याला जीवनदान दिले. नातेवाईकांनी दोन्ही हात जोडून या डॉक्टरांचे आभार मानले.
Teacher Promotion:टीईटी पात्र शिक्षकांचीच पदोन्नती! गुरुजींच्या संघटनांमध्ये मतभेद, अपात्र नेत्यांचा प्रशासनावर दबाव..केवळ २६ आठवड्यांच्या गर्भावस्थेत हे बाळ जन्माला आले. या बाळावर तब्बल १०० दिवस अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आले. बाळ निरोगी असून नुकतेच त्याला आईसह घरी पाठविण्यात आले. या कामगिरीसाठी अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. मनीष तिवारी यांच्यासह अतिदक्षता विभागातील सर्व डॉक्टरांचे कौतुक केले.
११ दिवस व्हेंटिलेटरवर, १० दिवस सी-पॅपवरबाळ श्वसन विकार घेऊनच जन्माला आले. तातडीने सर्फॅक्टंट थेरपी दिली. बाळ ११ दिवस व्हेंटिलेटरवर होते. त्यानंतर आणखी १० दिवस सी-पॅपमध्ये ठेवण्यात आले. श्वसन क्रिया सुरळीत झाली. मात्र, उपचारादरम्यान बाळाला सेप्टिसेमिया (रक्तातील संसर्ग) झाला. यासाठी २१ दिवस अँटिबायोटिक उपचार दिले. पुढे आतड्यांची गंभीर समस्या दिसून आली. अतिदक्षता विभागाचे प्रभारी व प्राध्यापक डॉ. आशिष लोथे, सहाय्यक प्राध्यापक डॉ. संदीप मानवटकर यांच्या देखरेखीत उपचार करण्यात आले.
काही दिवस आहार बंद ठेवून हळूहळू ओरोगॅस्ट्रिक फिडिंग करण्यात आले. त्यातच बाळाला रेटिनोपॅथी ही डोळ्यांची समस्या आढळून आली. त्यातूनही बाळ बरे झाले. जन्मजात हृदयविकारांचेदेखील व्यवस्थापन करण्यात आल्याची माहिती बालरोग विभागप्रमुख डॉ. मनीष तिवारी यांनी दिली. डॉ. मरीया शेख, डॉ. शुभांगी नीमा, डॉ. मुग्धा भिवगडे आदींनी उपचारात मोलाची साथ दिली.
UPSC Success Story: वॉचमनच्या मुलाची ‘यूपीएससीत’ भरारी; आईचे किराणा दुकान अन् वडिलांचा पालिकेत पहारा, मुलाने यशाला गवसणी घालून फेडले पांग!बाळ मुदतपूर्व जन्माला आल्याने गुंतागुंत निर्माण झाली. दुर्मीळ आणि गुंतागुंत झाल्यानंतरही योग्य नियोजनातून त्यावर मात करता येते, हे मेडिकलमधील डॉक्टरांच्या उत्तम उपचारातून सिद्ध झाले.
- डॉ. राज गजभिये, अधिष्ठाता, मेडिकल.