Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा उलटफेर! MCX बाजारात दर घसरले; आज 1 तोळा सोनं कितीला?
esakal March 11, 2026 02:45 PM

Gold and Silver Price Today: सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानल्या जाणाऱ्या सोन्याच्या किमतींमध्ये यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासून मोठी चढ-उतार दिसत आहेत. जागतिक अनिश्चितता वाढली असतानाही आणि अमेरिका-इस्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवरही सोने-चांदीच्या भावात अपेक्षित मोठी वाढ झाली नाही. उलट त्यांच्या किमतींमध्ये सातत्याने अस्थिरता आणि चढ-उतार पाहायला मिळत आहेत.

MCX बाजारातील भाव

आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्या-चांदीच्या दरांची सुरुवात घसरणीसह झाली. सकाळी बाजारात एप्रिल फ्युचर्ससाठी सोन्याचा भाव 403 रुपयांनी घसरून 1,62,900 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. मे फ्युचर्ससाठी चांदीचा भावही 2,850 रुपयांनी घसरून 2,75,000 च्या आसपास व्यवहार करत आहे.

Stock Market Today: शेअर बाजाराची मिश्र सुरुवात! युद्ध समाप्तीच्या संकेतांनी बाजाराला दिलासा; मात्र या सेक्टरवर दबाव वाढला सोन्याचा भाव

Goodreturns च्या वेबसाइटनुसार, कमोडिटी बाजारात घसरण झाली असली तरी आज राजधानी दिल्लीत सोन्याच्या भावात मात्र वाढ झाली आहे. आज दिल्लीत 24 कॅरेट सोनं प्रति 10 ग्रॅम 930 रुपयांनी वाढून 1,63,460 रुपयांना विकलं जात आहे. तर 22 कॅरेट सोनं प्रति 10 ग्रॅम 1,49,850 रुपयांना विकलं जात आहे.

चांदीचा भाव

आज सोन्याच्या भावात वाढ झाली असली तरी चांदी मात्र स्थिर आहे. दिल्लीमध्ये चांदी प्रति किलो 2,90,000 रुपयांना विकली जात आहे. म्हणजेच 100 ग्रॅम चांदीचा भाव सध्या 29,000 रुपये इतका आहे.

PPF Investment: PPF मध्ये गुंतवणूक फायदेशीर की तोट्याची? टॅक्स बचत आणि रिटर्नचं खरं गणित जाणून घ्या महाराष्ट्रातील सोनं-चांदीचा भाव

Goodreturns च्या आकडेवारीनुसार राज्यातही 24 कॅरेट सोन्याच्या भावात प्रती तोळा 930 रुपयांची वाढ झाली आहे. आज राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, जळगाव, कोल्हापूर, छ. संभाजीनगर, नाशिक आदी शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा 1,61,310 रुपयांच्या आसपास आहे.

त्यासोबतच दागिन्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा 1,49,700 आणि प्रति ग्रॅम 14,970 रुपये आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा भाव 12,248 रुपये प्रति ग्रॅम इतका आहे. दरम्यान, राज्यभर चांदीचा भाव 2,90,000 रुपये इतका आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.