-राहुल मैंद
ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्याच्या टोकावर वसलेले ब्रह्मपुरी शहर जिल्हा मुख्यालयापासून तब्बल १२५ किलोमीटर अंतरावर आहे. गडचिरोली जिल्हा वगळता महाराष्ट्रात जिल्हा मुख्यालयापासून इतक्या लांब असलेले शहर क्वचितच आढळते. शिक्षणाची पंढरी, वैद्यकीय नगरी तसेच सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या ब्रह्मपुरीला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्याची मागणी पुन्हा एकदा ऐरणीवर आली.
Teacher Promotion:टीईटी पात्र शिक्षकांचीच पदोन्नती! गुरुजींच्या संघटनांमध्ये मतभेद, अपात्र नेत्यांचा प्रशासनावर दबाव..चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून २६ ऑगस्ट १९८२ रोजी गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. त्यापूर्वी प्रशासकीय समितीच्या अहवालांमध्ये ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण करण्याची शिफारस करण्यात आल्याचे सांगितले जाते. १३ एप्रिल १९८२ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब भोसले यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून नव्या जिल्ह्याचे मुख्यालय ब्रह्मपुरी येथे राहील, अशी घोषणा केल्याची माहिती आहे. मात्र पुढे राजकीय दबावामुळे हा निर्णय बदलण्यात आला.
दरम्यान, प्रशासनिक सुलभता आणि जनतेच्या सोयीच्या दृष्टीने चंद्रपूर जिल्ह्याचे पुन्हा विभाजन करून ब्रह्मपुरी जिल्ह्याची निर्मिती करण्याची मागणी सातत्याने होत आहे. या मागणीसाठी नागरिकांनी चक्काजाम, ब्रह्मपुरी बंद, मुंडण आंदोलन अशी आंदोलने केली. औद्योगिकदृष्ट्याही ब्रह्मपुरीचे महत्त्व वाढले आहे. येथील तांदूळ देशातील विविध भागांत पाठवला जातो.
इंग्रजकालीन प्रशासनाच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात केवळ पाच तालुके होते. त्यात ब्रह्मपुरी, वरोरा, चंद्रपूर, गडचिरोली आणि सिरोंचा या तालुक्यांचा समावेश होता. सध्या चंद्रपूर, ब्रह्मपुरी व वरोरा हे तालुके चंद्रपूर जिल्ह्यात, तर गडचिरोली व सिरोंचा हे गडचिरोली जिल्ह्यात आहेत.
ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीसाठी १९८० पासून आंदोलने होत आहेत. गरज पडल्यास यापुढेही अधिक आक्रमक आंदोलन उभारले जाईल.
-प्रशांत डांगे, निमंत्रक, ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण समिती
UPSC Success Story: वॉचमनच्या मुलाची ‘यूपीएससीत’ भरारी; आईचे किराणा दुकान अन् वडिलांचा पालिकेत पहारा, मुलाने यशाला गवसणी घालून फेडले पांग!चंद्रपूर जिल्हा मुख्यालय ब्रह्मपुरीकरांसाठी खूप दूर आहे. ब्रह्मपुरी जिल्हा झाल्यास प्रशासन जनतेच्या अधिक जवळ येईल. शासनाने याचा गांभीर्याने विचार करावा.
-डॉ. नितीन उराडे, उपाध्यक्ष, नगरपरिषद ब्रह्मपुरी