RUCHITA JAMDAR OPENS UP ABOUT TROLLS AND FAMILY PAIN: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये स्पर्धक आपल्या खेळ दाखवण्यासाठी प्रयत्न करताना पहायला मिळतय. अशावेळी ते घरातील इतर सदस्यांच्या चुका दाखवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीय. अशातच रुचिता जामदारची बिग बॉसच्या घरातून एक्झिट झालीय. तिचं घरातून जाणं सगळ्यांसाठी धक्कादायक होता. रुचिता घरातून एवढ्या लवकर बाहेर येईल असं कोणालाच वाटलं नव्हतं.
दरम्यान नुकतीच रुचिताने मीडिया टॉक मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना तिने अनेक खुलासे केले आहे. याशिवाय तिच्या आणि विशालच्या नात्याबद्दलच्या चर्चेबाबत तिने स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच तिने त्याच्या नात्याच्या चर्चेवर घरच्यांना कसा त्रास झाला? याबद्दल सुद्धा सांगितलं आहे.
रुचिता म्हणाली की, 'होय, शो संपल्यानंतर मी विशालसोबत मैत्री कायम ठेवणार आहे. कारण आमचं नातं कधीच मैत्रीसाठी नव्हतं. ते खरं होतं. आमच्यात मैत्री होती, प्रेम अजिबात नव्हतं. ती एक भावनिक अटॅचमेंट होती. कारण सगळं घर माझ्या विरोधात असताना फक्त तो माझ्या बाजूने उभा होता. माझ्या मैत्रिणीने अनुश्रीने सुद्धा माझी साथ सोडली, माझा भाऊ रोशनची एक्झिट झाली. त्यामुळे आमच्यात मैत्री अधिक घट्ट झाली. परंतु आमच्यात प्रेम किंवा घाणेरडं काहीच नव्हतं.'
View this post on InstagramA post shared by RUCHITA JAMDAR (@ruchujamdar)
पुढे बोलताना रुचिता म्हणाली की, 'माझ्या मनात विशालबद्दल कधीच प्रेम नव्हतं. पण खुप लोक माझ्या पप्पांना येऊन बोलायचे, म्हणायचे.. चांगलं वाटतय का हे? तुमची मुलगी पन्नास वर्षांच्या म्हाताऱ्यासोबत लफडं करतेय. तेव्हा माझ्या पप्पाच्या पायाखालची जमीन सरकली, माझे बाबा कधीच रडले नव्हते, त्यादिवशी खुप रडले. जेव्हा मला हे समजलं तेव्हा खुप वाईट वाटलं, कारण मी चुकत असेल तर मला बोला... माझ्या घरच्यांना काय बोलताय. तुम्ही टीव्हीवर जे बघताय ते १०० टक्के खरं नसतं. आमच्यात नातं कधीच नव्हतं, तुम्हाला ते दाखवलं गेलय.' असं रुचिता मुलाखतीत बोलताना म्हणाली.
बाबो! बिग बॉसनंतर छोटा पुढारी सिनेमात दिसणार, पिक्चर बाईज सिनेमामध्ये हटके अभिनय, नेटकरी म्हणाले...