Artist Death: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा; ३१ वर्षीय कलाकाराचे अकाली निधन
Saam TV March 11, 2026 07:45 PM

Artist Death: मराठी चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘फुलवंती’ आणि ‘मुळशी पॅटर्न’सारख्या चित्रपटांसाठी काम केलेला तरुण सिनेमॅटोग्राफर तन्मय वनमाळीचे वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी निधन झाले. त्याच्या अचानक झालेल्या निधनामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

तन्मय वनमाळी हा मराठी चित्रपटसृष्टीतील उभरता सिनेमॅटोग्राफर म्हणून ओळखले जात होते. त्यांने अनेक महत्त्वाच्या प्रोजेक्ट्समध्ये काम करत आपल्या कॅमेऱ्याच्या नजरेतून उत्तम सीन टिपली होती. ‘फुलवंती’ या चित्रपटासाठी त्यांनी प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर महेश लिमये यांच्यासोबत काम केले होते. या चित्रपटात अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेता गश्मीर महाजनी मुख्य भूमिकेत आहेत.

Rashmika Mandanna: 'पदरावर देवी, हातावर मेंहदी...'; रश्मिका मंदान्नाच्या मेहंदी समारंभाचे सुंदर फोटो व्हायरल

याशिवाय त्यांनी ‘सरसेनापती हंबीरराव’ आणि ‘मुळशी पॅटर्न’सारख्या चित्रपटांमध्येही काम केले होते. कमी वयातच त्यांनी सिनेमॅटोग्राफीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या कामाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांकडून अनेकदा कौतुक केले जात असे.

Youtuber Death: प्रसिद्ध युट्यूबरचा वयाच्या ३१ व्या वर्षी संशयास्पद मृत्यू; जंगलात आढळला मृतदेह, मनोरंजन सृष्टीत खळबळ

तन्मय वनमाळीने केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही काम केले होते. ‘दबंग 2’, ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘हिरामंडी’सारख्या प्रोजेक्ट्समध्ये त्याने कामाचा अनुभव घेतला होता. तसेच, दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या आगामी ‘रामायण’ या बिग-बजेट चित्रपटासाठीही त्यांनी काम केल्याची माहिती समोर आली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.