Sushma Andhare on Rupali Chakankar : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातमुळे (Ashok Kharat) अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकरांना (Rupali Chakankar) राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षापदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. मंत्र-तंत्राच्या सहाय्याने महिलांना संमोहित करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणारा नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचे (Ashok Kharat) नवनवीन कांड समोर आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे याच मुद्दयावरून विरोधकांनी सरकारवर कडाडून टीका करत हल्लाबोल केलाय. अशातच या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत. दरम्यान, रुपाली चाकणकरांना आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सुषमा अंधारे यांनी आपल्या फेसबुक पोस्ट आणि व्हॉट्सॲप स्टेटस ठेवत चाकणकरांना पुन्हा एकदा डिवचलं आहे.
Sushma Andhare on Rupali Chakankar : चाकणकरांचा आणि नैतिकतेचा सुतराम संबंध नाही
'चाकणकरांना जर स्वेच्छेने ने राजीनामा द्यायचा असता तर तो त्यांनी एक वर्षापूर्वी जेव्हा हे प्रकरण त्यांच्या कानावर आलं तेव्हाच किंबहुना किमान तीन दिवस आधी तरी तो राजीनामा दिला असता. चाकणकर शेवटच्या क्षणापर्यंत पद वाचवण्यासाठी धडपडत राहिल्या. चाकणकरांना जरा जरी पश्चातापबुद्धी झाली असती तर त्या खरातची अटक झाल्याबरोबर राजीनामा देऊन मोकळ्या झाल्या असत्या, मुळात हा राजीनामा नाही ही हकालपट्टी आहे. चाकणकरांनी शब्दाची मलमपट्टी करून उगाच केविलवाणी धडपड करू नये.
नुसता राजीनामा पुरेसा नाही. चाकणकरांवर गुन्हा दाखल करून त्यांना सहआरोपी करून आणि त्यांची अटक होणं जास्त गरजेचे आहे...' अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली आहे.
Sushma Andhare WhatsApp Status : सुषमा अंधारेंच व्हॉट्सऍप स्टेटस काय?
सुषमा अंधारे यांनी आपल्या व्हॉट्सऍप स्टेटसवर लिहिलं आहे,''मोठेमोठे गार केले गंमतमधी'. अशा शब्दात चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर सुषमा अंधारे यांच्या या दोन्ही पोस्टची जोरदार चर्चा सुरु आहे.
नेमकं प्रकरण काय? (Nashik Ashok Kharat Case)
अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक खरात याने एका 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार (Rape news) केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बुधवार 18 मार्च रोजी खरात याला पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. अशोक खरात हा सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून तो नावारुपाला आला. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जातात. मात्र, त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.