Ashok Kharat : अल्पवयीन मुलगी आणि केबल टेस्टर… भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर
Tv9 Marathi March 21, 2026 12:45 PM

स्वयंघोषित ज्योतिषी आणि स्वत:ला कॅप्टन म्हणवून घेणाऱ्या अशोक खरातचं (Ashok Kharat ) बिंग फुटलं असून महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपखाली पोलिसांनी त्याला अटक केलं. मात्र तेव्हापासून त्याचे एकेक कारनामे समोर येत असून ते ऐकून मन सुन्न होतं. त्याच्या कार्यालयात बोलावून अनेक महिलांना वासनेची शिकार करणआऱ्या या भोंदूबाबाने या सगळ्या काळ्या कारनाम्यांचे व्हिडीओही तयार केले. 58 पेक्षा जास्त व्हिडीओ समोर आले असून यामुळे राज्यभरात खळबळ माजली आहे.

महिलांचे शोषण करण्यासाठी तो काय मोडस ऑपरेंडी वापरायचा, कसं त्यांना भुलवायचा याची बरीच माहिती समोर आली होती. आता याच प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर आली असून त्यातून भोंदू अशोक खरातचे आणखी नवले कारनामे उघड झाले आहेत. महिलांवर, मुलींवर उपचाराचा दावा करणाऱ्या या भोंदूबाबाने ‘केबल टेस्टर’ आणि तांत्रिक उपकरणांचा वापर करून भोंदूगिरी केल्याचे उघड झाले आहे. यामुळे संपूर्ण राज्यात आणखीनच खळबळ माजली आहे.

भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर

स्वयंघोषित ज्योतिषी, अंकशास्त्रज्ञ म्हणवणारा अशोक खरात याचा आणखी एक फंडा समोर आला आहे. अल्पवयीन मुलीवर अघोरी उपचार केल्याचं सीसीटीव्ही फुटेज आता व्हायरल झालं असून तो ‘केबल टेस्टर’ आणि तांत्रिक उपकरणांचा वापर करून भोंदूगिरी करत असल्याचं त्यातून उघड झालं आहे. त्यामुळे या प्रकरणाला चांगलंच गंभीर वळण मिळालं आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ समोर आल्याने खळबळ माजली आहे. उपचाराच्या नावाखाली भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर आलाय. भोंदू अशोक खरातने मुलीच्या पोटावर ‘इंटरनेट केबल टूल’ने उपचाराचा बनाव केला. त्या मुलीच्या पोटावर स्पर्श करत अघोरी उपचार करत असल्याचं भासवलं. त्यामुळे अंधश्रद्धा आणि फसवणुकीचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. मात्र या फुटेजमुळे आता भोंदूबाबा अशोक खरातच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Ashok Kharat : पेढा, खारट-कडवट पाणी आणि लागलीच स्पर्श… लिंगपिसाट अशोक खरातच्या शोषणाचा पॅटर्न उघड

मास्टरमाईंड नीरजही पोलिसांच्या ताब्यात

अशोक खरात याला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असून ज्याच्यामुळे हा सगळा प्रकार उघड झाला, खरातचा तो ऑफीसबॉय नीरज जाधव यालाही काल अटक करण्यात आली. नीरजने अत्याचाराचवे व्हिडीओ मिळवत खरातला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याने काही भाव दिला नाही. त्यानंतर नीरज जाधव याने पीडित महिलांचीच मदत घेण्याचा प्रयत्न केला. शिर्डीतील एका 24 वर्षांच्या विवाहितेचे मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडीओ नीरजने तिलाचा व्हॉट्सॲपवर पाठवले आणि तिला धमकावलं. ते पाहून त्या पीडित महिलेने यासंदर्भात अशोक खरातला कळवलं. स्वतःला वाचविण्यासाठी अशोक खरातने त्या महिलेलाचा पोलिसात जाण्यास सांगितलं. एवढं करूनही खरातकडून काही पैसे मिळणार नाहीत, हे लक्षात आल्याने नीरज जाधव याने तोच व्हिडीओ सिडको येथील 28 वर्षीय विवाहितेचा व्हिडीओ तिच्या मेहुण्याला पाठवला. ते पाहून मेहुण्याने पीडितेला धीर दिला आणि फिर्याद नोंदवण्यास सांगितली. त्या महिलेने धीर दाखवत पोलिसांत धाव घेतली आणि खरातच्या काळ्या कृत्यांचा अखेर भांडाफोड झाला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.