xxपिसाट खरातसोबत असलेल्या 'नवरत्न नेत्यांचे' सीडीआर तपासले पाहिजे, नाशिकचं प्रकरण आणि एपस्टीन फाईल्स सारखंच; विजय वडेट्टीवारांची सडकून टीका
तुषार कोहळे March 21, 2026 02:13 PM

Vijay Wadettiwar on Ashok Kharat Case: चाकणकरांचा (Rupali Chakankar)राजीनामा हा होणारच होता, कारण त्या ज्या पदावर काम करत होत्या त्या पदावर राहून हे अशोभनीय आहे. भोंदू बाबाच्या चक्करमध्ये इतकी मानसिक गुलामी पत्करणे आणि त्या पदावर राहून महाराष्ट्रातील महिलांना त्या न्याय देऊ शकत नव्हत्या. ज्यांचा विश्वास भोंदूगिरीवर आहे, ज्यांच्या विश्वास अशा अनिष्ट प्रथांवर आहे, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या महिलांच्या अन्याविरुद्ध त्या न्याय देण्याची भूमिका स्वीकारू शकत नाही. त्यांचा राजीनामा झाला. मात्र आता या लिंगपिसाट खरात सोबत असलेल्या नवरत्नांचे जे फोटो आहेत, खरात यांचे आज अफाट अशी संपत्ती आहे, जे जे त्यांच्या संपर्कात आले त्यांचा सीडीआर तपासला पाहिजे, आणि काय काय कृत्य केले, काय संवाद झाला आणि कशाप्रकारे महाराष्ट्रात सत्तेत राहून अनेक मंत्र्यांनी त्यांच्या आहारी जाऊन कुठले कुठले कृत्य केले, याची माहिती महाराष्ट्राला कळली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. दरम्यान, नाशिकचे हे प्रकरण एपस्टिन फाईल सारखंच आहे. एक दोन नाहीतर 56 व्हिडिओ त्यात सापडले आहेत. असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar on Ashok Kharat Case: खरातसोबत असणाऱ्यांवर कोणत्याही परिस्थितीत कारवाई झाली पाहिजे

अलीकडे भोंदूगिरी खूप वाढली आहे, कीर्तनकार थोरात यापूर्वी आला, काही लोकांकडून धर्माच्या नावावर अधर्म सुरू आहे. महाराष्ट्राची जी काही बदनामी होत आहे, हे फार वाईट आहे. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि खरातच्या सोबत असणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत कारवाई झाली पाहिजे यासाठी आमचा आग्रह राहणार आहे. असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar : पुढचे टार्गेट कोण याची सगळी माहिती आमच्याकडे

रुपाली चाकणकर यांनी वैयक्तिक नाही तर खरातांमुळे राजीनामा दिला, असं चाकणकर सांगतील? पाय धुण्याचे, खरातंवर छत्री धरण्याची काही उदाहरण होते. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला पुढचे टार्गेट कोण याची सगळी माहिती आमच्याकडे आहे. सोमवारी सभागृहामध्ये हे प्रकरण मांडू असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar on  Rupali Chakanka : चाकणकर यांना आता बोलण्याचा अधिकार नाही

कोणी कोणाला वाचवत असतील तर ते मोठं पाप आहे. म्हणजे काही दिसतं त्यामुळे कोणाचं नाव घेणे योग्य नाही, पण जे व्हिडिओ आले ते अत्यंत माणसाला लाज वाटावे अशा पद्धतीचे ते व्हिडिओ आहेत. असेही ते म्हणाले. सरकारला स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी खरातला वाचवणे आवश्यक वाटत आहे. म्हणून हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. नाहीतर ज्यांनी हे प्रकरण करून काढलं, त्याला अटक करण्याची काय गरज होती? पुरुष आणि महिलांनी आपल्या मर्यादा ठेवून वागलं पाहिजे, मग कोणी कोणाला टार्गेट करणार नाही. करंगळी कापून घेण्याचा एक फोटो काल आला, यात काय सत्य आहे, याप्रकरणी चाकणकर ज्या पद्धतीने वागले ते योग्य नाही, म्हणून त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar : भोंदूबाबा प्रकरणातील सर्व नेत्यांची चौकशी व्हावी

एकंदरीत या भोंदूबाबा प्रकरणात सत्ताधारी किंवा इतरही पक्षाचे नेते आहेत, नाव मी घेणार नाही, पण ते फोटो दिसत आहेत त्या जिल्ह्यातील, बाजूच्या जिल्ह्यातील मोठमोठे नेते, यापूर्वी महसूल मंत्री राहिलेले नेते, आताच्या मंत्रिमंडळात असलेले नेते देखील आहेत. राधाकृष्ण विखे पाटलांचाही फोटो दिसत आहे, दीपक केसरकर यांची काय चौकशी केली? तर सर्वांची चौकशी करायला पाहिजे. काल साताऱ्यात शंभूराजेंना धक्काबुक्की झाली. त्यांची माणसं पळवले गेले, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले त्यांच्याकडे बहुमत असताना लोकं पळवून भाजपने उपाध्यक्ष आणि अध्यक्ष केला. मंत्र्याच्या हाताला दुखापत झाली. यावरून किती छान चाललं आहे हे तीन डबे कुठ कुठल्या दिशेने पळत आहेत, हे महाराष्ट्रातील जनता बघत आहे. असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.