'त्या' डुक्कर पालन प्रकल्पामुळे त्रास
esakal March 21, 2026 10:45 PM

32362

‘त्या’ डुक्कर पालन प्रकल्पामुळे त्रास

निरवडे ग्रामस्थ; शिवसेना जिल्हाप्रमुखांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ : निरवडे (ता. सावंतवाडी) येथे भरवस्तीत सुरू असलेल्या डुक्कर पालन केंद्राचा स्थानिक ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. यातून मार्ग काढण्याची मागणी तेथील ग्रामस्थांनी शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांच्याकडे आज निवेदनाद्वारे केली. हा प्रश्न पालकमंत्र्यांच्या माध्यमातून सोडवण्याची ग्वाही त्यांनी दिली.
संबंधित ग्रामस्थांनी आज श्री. परब यांची भेट घेतली. यावेळी त्यांना निवेदन दिले व न्याय मिळवून देण्याची मागणी केली. यावर श्री. परब म्हणाले, ‘‘कुणीही व्यवसाय करण्यास हरकत नाही. मात्र, इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. ग्रामस्थांनी ६ महिन्यांपासून आरोग्य विभागाकडे तक्रारी करूनही त्याची कोणतीही दखल घेतली नाही. ही बाब गंभीर असून, हा विषय पालकमंत्री नीतेश राणे यांच्या कानावर घालून ग्रामस्थांना निश्चितच न्याय मिळवून देऊ.’’
परब पुढे म्हणाले, ‘‘डुकराच्या विष्ठेच्या दुर्गंधीमुळे स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तक्रार करूनही अधिकारी दुर्लक्ष करत असतील, तर त्यांना पालकमंत्र्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.’’ यावेळी राजू धुमाळ, विलास नाईक, प्रतीक्षा पारकर, रोहन धुमाळ, वासुदेव गावडे, सर्वेश जाधव, चंद्रशेखर पेडणेकर आदी उपस्थित होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.