Chanakya Niti : या चार गोष्टी माणसानं कावळ्याकडून शिकायलाच हव्यात, आयुष्यात कधीच नुकसान होणार नाही
Tv9 Marathi March 22, 2026 12:45 AM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहलिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षणाचं हे प्रचंड महत्त्व असतं. मात्र केवळ पुस्तकी शिक्षण घेऊनच माणूस हा बुद्धिमान होऊ शकत नाही. तर निसर्गात देखील अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याच्यापासून तुम्ही शिकलं पाहिजे. जर तुम्ही निसर्गाचं सुक्ष्म निरीक्षण केलं तर तुम्हाला असं जाणवेल की निसर्गापासून शिक्षण्यासाख्या अनेक गोष्टी आहेत. कावळा हा निसर्गातील एक प्रमुख घटक आहे. कावळा हा अत्यंत चतूर पक्षी आहे. त्याच्यापासून चार गोष्टी या शिकण्यासारख्या असतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

गुप्तता ठेवा – चाणक्य म्हणतात कावळा हा नेहमी आपली शिकार गुप्त पद्धतीने करतो, तसेच आपलं घर देखील तो अशा ठिकाणी बनवतो, की ज्या ठिकाणी सहसा कोणाची नजर जाणार नाही. माणसानं देखील कावळ्या प्रमाणेच आपल्या खासगी गोष्टी तसेच आयुष्यातील प्लॅन हे गुप्त ठेवले पाहिजेत.

हुशारी – चाणक्य म्हणतात कावळा हा जगातील सर्वात हुशार पक्ष्यांपैकी एक आहे. कावळ्याच्या हुशारीच्या अनेक गोष्टी देखील सांगितल्या जातात. माणसानं देखील कावळ्या प्रमाणे हुशार असलं पाहिजे

सतर्कता – कावळा हा कायम सतर्क असतो, त्यामुळे तो सहसा पकडला जात नाही. शिकाऱ्यांच्या तावडीत सापडला जात नाही. तसेच माणसानं देखील आपल्या आयुष्यात कायम सतर्क असलं पाहिजे. तरच तुम्ही आयुष्यात प्रगती करू शकता.

संरक्षण – कावळा हा आपलं संरक्षण करण्यासाठी सक्षम असतो. वेळ पडली तर तो कोणावरही हल्ला करू शकतो, त्याचप्रमामे मानसांना देखील आपलं संरक्षण करता आलं पाहिजे असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.