SRH Viral Video: सिलेक्टर्ल ऐकतायेत, जरा सांभाळून... इशान किशनची सर्वांसमोर नितीश रेड्डीला वॉर्निंग; अभिषेक शर्मालाही लागला हसू
esakal March 24, 2026 12:45 AM

1. इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेपूर्वी सनरायझर्स हैदराबादच्या कार्यक्रमात इशान किशनने नितीश रेड्डीला गमतीशीर वॉर्निंग दिली.

2. नितीशने टी२० क्रिकेटला पसंती दिल्यावर इशानने त्याला कसोटी क्रिकेट निवडण्याचा सल्ला दिला.

3. इशानच्या प्रतिक्रियांवर अभिषेक शर्मा आणि इतर खेळाडू हसले.

4. हा संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

5. पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत इशान किशन हैदराबादचे नेतृत्व करणार आहे.

इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी विविध संघांचे काही कार्यक्रम होत आहे. नुकताच सनरायझर्स हैदराबादचाही असाच एक कार्यक्रम पार पडला, या कार्यक्रमासाठी प्रभारी कर्णधार इशान किशन, उपकर्णधार अभिषेक शर्मा, अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी, ट्रॅव्हिस हेड, हेन्रिक क्लासेन असे अनेक खेळाडू उपस्थित होते. यादरम्यान, इशान किशन (Ishan Kishan) नितीश कुमारने (Nitish Kumar Reddy) दिलेल्या एका उत्तरावर त्याला वॉर्निंग देताना दिसला.

IPL 2026 तोंडावर असताना जसप्रीत बुमराह बंगळुरूतील CoE मध्ये दाखल ! मुंबई इंडियन्सला धक्का बसणार?

झाले असे की सनरायझर्स हैदाराबादचे (Sunrisers Hyderabad) खेळाडू एकत्र स्टेजवर खुर्चीत बसले होते. यावेळी निवेदक या खेळाडूंना विविध प्रश्न विचारत होते.

यावेळी निकीश कुमारला निवेदकाने टी२० की कसोटी क्रिकेट, यापैकी एका प्रकाराची निवड करण्यास सांगितले. यावेळी नितीशने टी२० क्रिकेटला निवडले, त्यानंतर लगेचच निवेदकाने त्याला टी२० आणि वनडे यात निवड करण्यास सांगितले.

पण त्यावेळी अचानक इशान किशन म्हणाला, 'रेड्डी, रेड्डी, भावा, तू कसोटी क्रिकेट संघाचा भाग आहेस. तू कसोटी क्रिकेट म्हणायला हवं, भावा.' यावेळी त्याने नितीश कुमार रेड्डीला अशीही वॉर्निंग दिली की 'सिलेक्टर्स ऐकत आहेत.'

नितीश कुमार रेड्डी भारताच्या कसोटी संघातील नियमित खेळाडू आहे. मात्र इशानने वॉर्निंग दिल्यानंतरही नितीशने टी२० हे उत्तर कायम ठेवलं. यानंतर त्याने टी२० आणि वनडे यापैकी वनडे क्रिकेटची निवड करताच पुन्हा इशान हसू लागला. त्याने त्याला तू वनडे संघाचाही भाग आहे ना विचारले. नितीशने त्यावर होकार दिला. इशान यावेळी नितीश खुप चांगला क्रिकेटपटू असल्याचेही म्हटले.

IPL 2026 Video: धोनी वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत खेळणार? थालाचं उत्तर ऐकून आख्ख्या स्टेडियममध्ये जल्लोष

यानंतर नितीशला पॉवरप्लेमध्ये की डेथ ओव्हरमधील फलंदाजी यामध्ये निवड करायला लावली. पण नितीशने पॉवरप्ले निवडल्याने इशान चकीत झाला आणि तो हसत म्हणाला, 'तू ६ व्या क्रमांकावर फलंदाजी करतो.' त्यावेळी इशानने डोक्यावरही हात मारला.

त्यावेळी नितीश म्हणाला, 'मला पॉवरप्लेमध्ये फलंदाजी करायला आवडते, पण यासोबत मी डेथ ओव्हरपण निवडेल.' त्यानंतर इशान त्याला म्हणाला, 'तुला ६ व्या क्रमांकावर फलंदाजी करायची असते रे, तू डेथ ओव्हर्स म्हणालाला हवं.' यानंतर इशान असंही म्हणाला की 'मला कळत नाहीये, त्याला कोणी चुकीची उत्तरं द्यायचीत असं सांगितलंय का?'

दरम्यान, इशान आणि नितीश यांच्यातील संवाद गमतीचा भाग होता, यात कोणतीही गंभीर वॉर्निंग नव्हती. यावेळी इशानच्या प्रतिक्रियांवर त्याच्या शेजारी बसलेल्या अभिषेक शर्मासह हैदराबादचे बाकीचे खेळाडूही खळखळून हसले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हैदराबादला या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी एक मोठा धक्का बसला आहे. त्यांचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी इशान किशन सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व करणार आहे. सनरायझर्स हैदराबादचा पहिला सामना २८ मार्च रोजी गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.