भाजपचे निवडणूक प्रमुख राजू पाटील राजे यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह इतर चार जणांविरोधात तब्बल १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. विजय वडेट्टीवार यांनी भाजप पक्ष आणि आपली वैयक्तिक बदनामी केल्याचा आरोप राजू पाटील यांनी केला आहे. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबत माहिती दिली.
राजू पाटील राजे यांनी सांगितले की, २८ डिसेंबर २०२५ रोजी विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांसमोर सार्वजनिकरित्या नकली नोटांप्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल असून मला अटक झाली होती, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे माझी प्रतिमा मलिन झाली. मात्र, हे सर्व आरोप पूर्णपणे खोटे असून माझ्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल झालेला नसल्याचा दावा त्यांनी केला.
Sanjay Raut Apology Farmers : संजय राऊतांनी शेतकऱ्यांची माफी मागितली! मंत्री दादा भुसेंनी मालेगाव न्यायालयातील खटला घेतला मागे, दोघांची पत्रकार परिषदया पार्श्वभूमीवर त्यांनी विजय वडेट्टीवार यांना कायदेशीर नोटीस बजावून सार्वजनिकरित्या माफी मागण्याची मागणी केली होती. मात्र, संबंधितांकडून कोणतीही माफी मागितली गेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अखेर हा वाद न्यायालयात नेण्याचा निर्णय घेत राजू पाटील राजे यांनी वाशीम न्यायालयात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे.
Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: जिल्हापरिषद अन् पंचायत समिती निवडणूक निकालाचे अपडेट जाणून घ्या, एका क्लिकवरया दाव्यात विजय वडेट्टीवार यांच्यासह हरीश सारडा, तेजराव इनामदार, पंकज इंगोले आणि आनंद खेर्डे यांचाही समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकरणामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.