रुपाली चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार का? सुनिल तटकरे म्हणाले... 
प्रशांत बढे, एबीपी माझा March 22, 2026 12:43 AM

Sunil Tatkare : बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा वहिनींचा अर्ज 6 एप्रिलला बारामतीला भरणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिली. यासंदर्भातील  विषयावर आज चर्चा झाली आहे. या निवडणुक संदर्भात वेगवेगळी वक्तव्य येत आहेत. यावरही चर्चा झाली, बाकी काही चर्चा झाली नाही असे तटकरे म्हणाले. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याचया मुद्यावर देखील तटकरेंनी भाष्य केले.

रुपाली चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार का?

देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री. सुनेत्रा पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यात एक महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीनंतर तटकरे प्रसार माध्यमांशी बोलत होते. नाशिकचा भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपादाचा राजीनामा दिला आहे. आता त्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार का? असा सवाल देखील तटकरेंना विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, त्यांचा आयोगाचा राजीनामा आला आहे. वहिनी उपमुख्यमंत्री म्हणून तो राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवतील. यावर चर्चा झाली नाही, ज्यावेळी चर्चा होईल त्यावेळी निर्णय घेतला जाईल, कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे तटकरे म्हणाले. अशोक खरातने जे दुष्कृत्य केले त्यावर कारवाई व्हावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कडक भूमिका आहे असे तटकरे म्हणाले. 

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट 

अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर आज उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे देखील उपस्थित होते. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. उपराष्ट्रपती महोदय आज दादांच्या दुर्दैवी निधनानंतर सांत्वनपर भेट घ्यायला आले होते. दादांचा आणि त्यांचे व्यक्तिगत संबंध आले होते. उपराष्ट्रपतीपदी शपथ घेतल्यानंतर ते मुंबई दौऱ्यावर पहिल्यांदा आले होते असे तटकरे म्हणाले. अशोक खरातने जे दुष्कृत्य केले त्यावर कारवाई व्हावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कडक भूमिका आहे असे तटकरे म्हणाले. 

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन  यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करत आदरांजली वाहिली. या भेटीदरम्यान उपराष्ट्रपती श्री. राधाकृष्णन यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आणि पवार कुटुंबीयांचे सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी त्यांनी कुटुंबीयांना धीर देत आपल्या संवेदना व्यक्त केल्या.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.