जेवणानंतर पोट फुगल्यासारखं वाटतयं? त्वरित आराम देतील ‘हे’ 6 हर्बल चहा
GH News March 22, 2026 02:14 AM

आजकाल जेवणानंतर अनेक लोकांना पोट फुगणे, जडपणा आणि गॅसचा त्रास होतो. ही समस्या केवळ तेलकट पदार्थ खाल्ल्यानेच होते असे नाही, तर आपल्या शरीरातील मंद पचनक्रिया, बदलती जीवनशैली आणि अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयींमुळे देखील होऊ शकते. कधीकधी ही समस्या लोकं सामान्य आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु हीच समस्या रोजच होऊ लागले तर आरोग्यासाठी समस्या बनू शकते. अशा परिस्थितीत तज्ञ नैसर्गिक उपायांची शिफारस करतात आणि हर्बल चहा हा एक प्रभावी पर्याय मानला जातो. तर आजच्या लेखात आपण अशा सहा हर्बल चहाबद्दल जाणून घेऊयात ज्या पोट फुगण्यापासून आराम देऊ शकतात.

आल्याच्या चहामुळे पचनक्रिया सुधारते

आल्यामुळे पचनक्रिया जलद होते आणि गॅस कमी होतो. जेवणानंतर आल्याचा चहा प्यायल्याने पोटाला आराम मिळतो आणि अपचन दूर होते.

पुदिन्याचा चहा

पुदिना पोटाच्या स्नायूंना शिथिल करतो. यामुळे गॅस, पोटदुखी आणि पोट फुगणे यांसारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो. जेवणानंतर पुदिन्याचा चहा प्यायल्याने ते अधिक फायदेशीर मानले जाते.

बडीशेपच्या चहामुळे सूज कमी होईल

पचनासाठी बडीशेपचा वापर फार पूर्वीपासून केला जात आहे. त्यामुळे गॅस आणि पोट फुगणे कमी होते आणि पोटाला आराम मिळतो. जड जेवणानंतर बडीशेपचा चहा फायदेशीर ठरू शकतो.

कॅमोमाइल चहा पोटाला आराम देतो

कॅमोमाइल चहा केवळ पचनक्रिया सुधारत नाही, तर तणावही कमी करतो. त्यामुळे पोटाच्या समस्यांपासून आराम मिळू शकतो. याचे सेवन संध्याकाळी करणे सर्वोत्तम आहे.

ओव्याचा चहा प्रभावी आहे

ओव्याचा चहा पचनक्रिया सुधारते आणि त्यामुळे पोटातील गॅस कमी होतो. विशेषतः तळलेले पदार्थ खाल्ल्यानंतर हा चहा प्यायलने पोटाला आराम मिळण्यास मदत होऊ शकते.

लेमनग्रास चहा

लेमनग्रास चहा पचनक्रिया सुधारण्यास आणि पोट फुगण्याचा त्रास कमी करण्यास मदत करतो. तर हा लेमनग्रास चहा दिवसाच्या कोणत्याही वेळी घेतला जाऊ शकतो आणि त्यामुळे तुम्हाला हलके वाटू शकते.

जेवणानंतर पोट फुगण्याचा त्रास होत असल्यास तुम्ही तुमच्या आहारात या हर्बल चहांचा समावेश करू शकता. मात्र ही समस्या कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. योग्य आहार आणि जीवनशैलीने तुम्ही या समस्येपासून सहज आराम मिळवू शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.