भाजपच्या ज्येष्ठ नेत्या अलका केरकर यांचे निधन
माजी उपमहापौर आणि तीन वेळा नगरसेविका
लीलावती रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
माजी उपमहापौर आणि भाजपच्याविद्यमान नगरसेविका अलका केरकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. लीलावती रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास घेतला. अलका केरकर यांच्या निधनाने मुंबईच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्या वार्ड क्र. ९८ मधून नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या.
शनिवारी २२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सांताक्रूझ पश्चिम येथील राहत्या घरी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. उद्या दुपारी १२ वाजता सांताक्रूझमधील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
महापौर पदासाठी केरकर यांच्या नावाची चर्चाअलका केरकर या भाजपच्या अतिशय अनुभवी नगरसेविका होत्या. त्या सलग तीनवेळा मुंबई महापालिका निवडणुकीत जिंकून आल्या होत्या. २०१२ पासून त्या मुंबई महापालिकेत कार्यरत होत्या. विशेष म्हणजे २०१४ ते २०१५ या काळात त्या मुंबई महापालिकेच्या उपमहापौर देखील होत्या. त्यामुळे त्यांना मुंबई महापालिकेत प्रशासकीय कामकाजांचा प्रदीर्घ अनुभव होता.