इराण आणि अमेरिका युद्धामुळे जगातील सर्वच देश जैरीस आले. थेटपणे या युद्धाचा फटका बसताना दिसत आहे. 28 फेब्रुवारी 2026 रोजी सुरू झालेले युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. आतापर्यंत मोठे नुकसान युद्धामुळे होत आहे. जागतिक बाजारात तेलाच्या किमती गगणाला पोहोचल्या आहेत. पुढील काही दिवसात तेलाच्या किमती अधिक वाढण्याची शक्यता आहे. फक्त तेलाच्या किमतीच नाही तर युद्धात तेल रिफायनरी आणि गॅस प्रकल्पांना टार्गेट करून हल्ले केले जात आहेत. यामुळे जग ऊर्जेच्या एका वेगळ्या संकटात आहे. पुढील काही वर्ष यातून बाहेर पडण्यास लागणार आहेत. युद्ध थांबवण्याची मागणी जगातून होत असतानाच आता एक घातक प्लॅन अमेरिकेच्या डोक्यात असल्याचे बघायला मिळत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाद आता उघडपणे समोर येत आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला असून 48 तासात होर्मुज खाडी सुरू करण्यास सांगितले आहे. जर इराणकडून तसे करण्यात आले नाही तर अमेरिकेचे सैन्य इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करेल. याला उत्तर देताना इराणने स्पष्ट शब्दात सांगितले की, यानंतर इराण पूर्णपणे होर्मुज खाडी बंद करेल, अमेरिकेने जर असे कोणतेही पाऊल उचलले तर. शिवाय संपूर्ण प्रदेशात असलेल्या अमेरिकेशी संबंधित कंपन्यांवर हल्ला करेल.
अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसांत यांनी एनबीसी न्यूजला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी होर्मुज खाडीबद्दल मोठे भाष्य केले. स्कॉट बेसांत यांनी म्हटले की, होर्मुज सामुद्रधुनीजवळ इराणची तटबंदी आहे आणि तीच तटबंदी कमकुवत करण्याकरिता अमेरिकेचे लष्कर उतरवले जाईल. इराणची तटबंदी पूर्णपणे नष्ट करण्याकरिता मोहिम सुरू आहे.
स्कॉट बेसांत यांच्या या विधानावरून हे स्पष्ट आहे की, होर्मुज खाडीत पुढील काही तासात हाहाकार होणार आहे. कारण इराणची तटबंदी अमेरिकेकडून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला तर इराणही शांत बसणार नाही. मोठे हल्ले होऊ शकतात. यासोबतच जगातील जवळपास सर्वच देशांचे जहाज तिथे अडकले आहेत. जर काही वेगळे घडले तर मोठा विनाश होर्मुज खाडीत होण्याची शक्यता आहे.