इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून युद्ध अधिक पेटल्याचे बघायला मिळत आहे. मोठे घातक हल्ले केले जात आहेत. मात्र, अमेरिकेची मोठी नाचक्की या युद्धात झाली. इराणकडून होर्मुज मार्ग बंद करण्यात आला. होर्मुज खाडी सुरू करण्यासाठी अमेरिकेने ना ना प्रयत्न केले पण त्यांना अजिबातच यश मिळत नाही. फान्स, चीन, दक्षिण कोरिया यासारख्या देशांना अमेरिकेने युद्धनाैका पाठवण्यास सांगितले होते. मात्र, एकही देश अमेरिकेच्या मदतीकरिता पुढे आला नाही. अमेरिका या युद्धात एकटी पडली आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने आखाती देश अमेरिकेवर नाराज आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये होर्मुज खाडी सुरक्षित करण्यात यावी अशी मागणी केली जात आहेत. यासोबतच जागतिक बाजारात तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. तेलाच्या किमतीवर नियंत्रण मिळवण्याकरिता अमेरिकेने थेट रशियाचे तेल खरेदी करण्याचे आवाहन केले.
होर्मुज खाडी सुरक्षित करण्यात यावी, याकरिता अमेरिकेकडून इराणला 48 तासांचा वेळ देण्यात आला. मात्र, त्यानंतर इराणकडूनही अमेरिकेला मोठी धमकी देण्यात आली. अनेक प्रयत्न करूनही होर्मुज खाडी सुरक्षित होत नसल्याने आणि जगातील अनेक देशांचे तेलवाहू आणि मालवाहू जहाज तिथे अडकल्याने अमेरिकेवरील दबाव चांगलाच वाढला आहे. यादरम्यानच आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून होर्मुज खाडी सुरक्षित करण्याकरिता मास्टर प्लॅन तयार करण्यात आल्याची माहिती मिळतंय.
होर्मुज खाडी सुरक्षित करण्याकरिता मोठा हल्ला अमेरिका करू शकते असे सांगितले जात आहे. होर्मुज खाडी पार करायची असेल तर मोठे पैसे आता मोजावे लागणार आहेत. इराणकडून जहाजांकडून मोठा पैसा होर्मुज खाडीत घेतला जात आहे, हाच पैसा युद्धासाठी वापरणार असल्याचे सांगितले जात आहे. यादरम्यानच इस्रायली संरक्षण दलाने इराणमधील हवाई हल्ल्यांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. ज्या लक्ष्यांवर हल्ला करण्यात आला, ते दिसत आहे.
होर्मुज खाडीतून इराण पैसा कमावत आहे. त्यामुळे इराणला थेट युद्धासाठी पैसा मिळणार असल्याने युद्ध अधिक काळ सुरू राहू शकते. मात्र, अमेरिकेला होऊ द्यायचे नाही. कोणत्याही क्षणी अमेरिकेकडून मोठा हल्ला होर्मुज खाडीवर केला जाऊ शकतो. अमेरिकेकडून हल्ल्याचा पूर्ण प्लॅन तयार असल्याचे सांगितले जात आहे. होर्मुज खाडी सुरक्षित करण्याकरिता यावेळी तरी अमेरिका यश मिळते का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे.