'धुरंधर 2' बॉक्स ऑफिसवर सुस्साट; पाचच दिवसांत कमावला 600 कोटींचा गल्ला, फक्त विकेंडचं कलेक्शन ऐकाल तर...
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क March 23, 2026 01:43 PM

Dhurandhar 2 worldwide box office collection: धुरंधरप्रमाणे या चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टनेही प्रेक्षकांना भुरळ घातली. धुरंधर: द रिव्हेंजने केवळ भारतीय बॉक्स ऑफिसवर नाही तर, वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिसवर आपला डंका गाजवला आहे.  या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 4 दिवस झाले. आज या चित्रपटाचा पाचवा दिवस.  आता या चित्रपटाने 500 कोटींचा टप्पा पार केला असून, आता लवकरच 700 कोटींचा बिझनेस करण्यास सज्ज झाला आहे.  धुरंधर चित्रपटाने वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींचा गल्ला जमवला आहे. प्रेक्षकांमध्ये दुसरा पार्ट पाहण्यासाठी उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता दुसरा पार्ट देखील धुव्वाधार बॉक्स ऑफिसवर कमाई करत आहे.  

Sacnilkच्या रिपोर्ट्सनुसार,   धुरंधर 2 या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 541.97 कोटींचे ग्रोस कलेक्शन केले आहे. तर, विदेशात या चित्रपटाने 149.35 कोटींचे ग्रोस कलेक्शन केले आहे.  याचाच अर्थ असा की, वर्ल्डवाईड या चित्रपटाने  691.32 कोटींचे बॉक्स ऑफिसवर ग्रोस कमाई केली आहे. तर, रविवारी या चित्रपटाने भारतात 114.85 कोटींची बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे. आतापर्यंत धुरंधर 2 या चित्रपटाने बरेच रेकॉर्ड्स मोडले आहेत. लवकरच हा सिनेमा आणखी रेकॉर्ड्स मोडणार एवढं मात्र नक्की.

धुरंधर 2ने अनेक चित्रपटांना मागे टाकले. अवघ्या चार दिवसांत 691.32 कोटींचे वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिस कलेक्शन करुन नवा विक्रम रचला. या लिस्टमध्ये गदर 2 (691.08 कोटी), संजू (588.50), सैयारा (581 कोटी),बॉर्डर 2 (485.3 कोटी), हाऊसफुल 5 (288.67 कोटी), रेड 2 (243.06 कोटी) आणि सितारे जमीन पर (267.52)  या चित्रपटांचा समावेश आहे. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

धुरंधर: द रिव्हेंज या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंहने इंडियन स्पायची भूमिका साकारली आहे.  रणवीर सिंह व्यतिरिक्त आर. माधवन, अर्जून रामपाल, सारा अर्जून, संजय दत्त आणि राकेश बेदी यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत. सध्या हा चित्रपट आणखी किती कोटींचा बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवतो, हे लवकरच समोर येईल. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

सलमान खानच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनावर संकट, खलनायकाच्या निधनानं सगळंच विस्कटलं, कधी होणार रिलीज?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.