Gold-Silver Rate Today 23 March 2026 : वाट कसली पाहताय ? सोनं-चांदी धडाम् ! तब्बल इतक्या हजारांनी कोसळले भाव, आता 1 तोळा सोनं फक्त..
Tv9 Marathi March 23, 2026 02:46 PM

Gold Rate Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं आणि चांदी दाणकन खाली आपटलं आहे. 23 मार्च रोजी MCX उघडताचत दोन्ही धातून दणक्कन खाली पडले. 2 एप्रिलसाठीचे सोन्याचे वायदे 6852 रुपयांनी घसरून 1 लाख 37 हजार 640 रुपयांवर पोहोचलं. तर 5 मेसाठीचे चांदीचे वायदे तब्बल 12 हजार 621 रुपयांनी घसरून 2 लाख 14 हजार 49 रुपयांवर पोहोचलं. मात्र असं असलं तरी नंतर सोन्याच्या दरात किंचित सुधारणा झाली आणि तो 1 लाख 37 हजार 906 रुपयांवर पोहोचलं. मात्र चांदीचे भाव काही वधारले नाहीत, उलट या धातूमध्ये आणखी घसरण होऊन तो 2 लाख 14 हजार 022 रु वर पोहोचला. गेल्या आठवड्यापासून दोन्ही धातूंच्या दरांमध्ये घसरण होत आहे. या महिन्यात आतापर्यंत चांदीच्या दरात 21 % घट झाली आहे.

सोन्याच्या वायद्यांमध्ये एका दिवसात सुमारे 4.70 ० टक्क्यांची घसरण झाली, ज्यामुळे त्याचा भाव 1 लाख 37 हजार 708 वर आला. दरम्यान, एका महिन्यात सोन्याच्या भावात सुमारे 12.91 टक्क्यांची घट झाली आहे. त्यात थोडी सुधारणा झाली आणि तो सोनं 1,37,906 व्यवहार करू लागलं. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. सामान्यतः सोनं म्हणजे एक सुरक्षित गुंतवणूक मानले जाते, परंतु सध्या ते बरंच कमकुवत आहे.

चांदीत जोरदार घसरण

चांदीच्या दरात सोन्यापेक्षाही जास्त घसरण झाली आहे. एका दिवसात त्यात 5.50 % घट झाली आहे, तर एका महिन्यात 21.05 % ची घसरण झाली आहे. चांदीचा भाव सुमारे 2 लाख 14 हजारांवर स्थिर आहे. मात्र या घसरणीतून बाजारातील कमजोरी दिसून येते.

अल्प कालावधीत, दोन्ही धातूंमध्ये एका दिवसातही घसरण दिसून आली. मात्र एका महिन्याची आकडेवारी अधिक चिंताजनक आहे. विशेषतः, चांदीमधील 21 % घसरण ही गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बाजारातील सततच्या दबावाचे स्पष्टपणे संकेत यातून दिसतात.

1 आठवड्यात सोन्याची घसरण

गेला संपूर्ण आठवडाभर सोन्याच्या दरात घसरण सुरूच राहिल्याचे दिसून आलं. 13 मार्च रोजी सोन्याचा भाव 1 लाख 58 हजार 399 रुपये होता, मात्र 16 मार्चपर्यंत घसरून1 लाख 55 हजार 714 रुपये इतका झाला. त्यानंतरही घसरण सुरूच राहिली आणि 19 मार्च रोजी सोनं 1 लाख 47 हजार 889 रुपयेांपर्यंत खाली आलं. डॉलरचे बळकटीकरण, नफावसुली, वाढते बॉण्ड उत्पन्न आणि व्याजदर कपातीच्या कमी झालेल्या अपेक्षा यांमुळे सोन्याची मागणी कमकुवत झाली, हीच या घसरणीची प्रमुख कारणं होती.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.