Nanded Crime News: नांदेड शहराजवळच्या वाजेगाव बंधाऱ्यावर (Wajegaon Dam) एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात अचानक दुचाकीला लागलेल्या आगीत एक व्यक्ती दुचाकीसह जळालाय. या तरुणाचा उपचारापूर्वीच आगीत होरपळून मृत्यू (Youth Died) झाल्याची हृदयद्रवक घटना घडली आहे. दरम्यान, वाजेगावच्या पुलावर घडलेल्या या दुर्दैवी घटनेतील मृत इसमाची ओळख पटलेली आहे. मात्र या बाबत कमालीची गुप्तता पोलीस विभागाकडून घेण्यात आलेली आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास आता एटीएस (ATS) आणि गुन्हे शाखेकडून सुरू आहे. दुचाकी जवळ झालेले स्पोर्ट हे पेट्रोल टाकीचे होते, फटाक्यांचे होते, कि अन्य कुठल्या पदार्थाचा यात समावेश होता? याचा शोध फॉरेन्सिक टीम घेत आहे. पोलिसांनी मैद्याची ओळख पटविल्याची माहिती समोर येत असली तरी या त्याबाबत कमालीची गोपनीयता बाळगली जात आहे. ही दुचाकी परभणी जिल्ह्यातील एका तरुणाची असल्याची माहिती आहे. त्यादिशेने आता पोलीस तपास करत आहे.
Nanded Crime News: नेमकं प्रकरण काय?
नांदेडच्या वाजेगांव भागात एका धावत्या दुचाकीने पेट घेतल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यातील मयताची ओळख पटवण्यात पोलिसांना आता यश आले आहे. यावेळी घटनास्थळी मोठा पोलीस फाटा दाखल झालाय. ईद निम्मित सामूहिक नमाज पठण झाल्यानंतर ही घटना घडली. वाजेगाव पुलावरून दुचाकीस्वार जात असताना हा प्रकार घडला. त्यामुळे अफवांना मोठा उत्त आलाय. या प्रकरणी पोलीस अधिकचा तपास करत आहेत.
Chhatrapati Sambhajinagar Crime : प्राध्यापक लोंढे खून प्रकरणात 65 लाखांच्या लुटीचा तपास; 12 लाखांची कार जप्त
छत्रपती संभाजीनगरात घडलेल्या प्राध्यापक राजाभाऊ लोंढे हत्याकांडाच्या तपासात धक्कादायक आर्थिक बाबी समोर येत आहेत. मुख्य आरोपी विशाल राठोड याने लुटलेल्या ६५ लाखांपैकी तब्बल १२ लाख रुपये खर्च करून जुनी जॅग्वार कार खरेदी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी ही कार जप्त केली असली तरी उर्वरित ४३ लाखांहून अधिक रकमेचा हिशेब अद्याप लागलेला नाही. आर्थिक व्यवहारात झालेल्या या हत्येकांडमध्ये हे पैसे नेमके कुठे खर्च झाले, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. दरम्यान, आरोपीने घेतलेली कार अपघातात निकामी झाल्यानंतर दुरुस्तीसाठी कोकणवाडी येथील एका गॅरेजमध्ये ठेवली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने कार ताब्यात घेतली आहे. तपासादरम्यान आरोपी सातत्याने पोलिसांना गुंगारा देत असून समाधानकारक माहिती देत नाही. तसेच, गुन्ह्यात वापरलेला मोबाईल पुण्यात लपवून ठेवला असल्याची माहिती समोर आली असून तो जप्त करण्यासाठी पोलिसांचे पथक पुण्याकडे रवाना होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या