सातारा पोलिस अधीक्षकांचे निलंबन करा; उपसभापती निलम गोऱ्हेंकडून निर्देश; सातारा झेडपी राड्याची गंभीर दखल
निलेश बुधावले, एबीपी माझा March 23, 2026 01:13 PM

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये झालेल्या अभूतपूर्व राड्यानंतर विधान परिषद सभापती नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दाखल घेतली आहे. नीलम गोऱ्हे यांनी सातारा पोलीस अधीक्षकांचे निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात पुण्याच्या विभागीय आयुक्तांना लक्ष घालून चौकशीचे आदेश दिले आहेत. आज (23 मार्च) विधानपरिषदेमध्ये सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये झालेल्या राड्यावरून शिवसेना नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. सभापतींनी गंभीर दखल घेत सातारा पोलीस अधीक्षकांचे निलंबनाचे आदेश दिले. 
सातारा झेडपी अध्यक्षपद निवडमुकीत पालकमंत्री शंभूराज देसाई आणि कॅबिनेट मंत्री मकरंद पाटील यांना आपल्याच सदस्यांना सभागृहापर्यंत नेण्यासाठी पोलिसांशी आणि प्रशासनाशी झुंज द्यावी लागली. या झटापटीत शंभूराज देसाई जखमी झाले, तर मकरंद पाटील यांना 20-25 पोलिसांनी घेरले होते. अखेर, प्रशासकीय बळाचा वापर करून भाजपने आपला अध्यक्ष निवडून आणला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.