मोठी बातमी : भाजपकडून गळचेपी, आम्ही राजीनामा देऊ, शिवसेना मंत्र्यांची एकनाथ शिंदेंसमोर टोकाची भूमिका
सूरज सावंत March 23, 2026 03:15 PM

Eknath Shinde MLA: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूक राड्याचे पडसाद आज मुंबईत मंत्रालयात उमटत आहेत. संख्याबळ नसूनही भाजपने रडीचा डाव खेळत आपला अध्यक्ष बसवला. त्यासाठी पोलीस अधिक्षकांनी मदत केल्याचा आरोप शंभूराज देसाई यांनी केला. यानंतर शिवसेना मंत्र्‍यांनी आक्रमक भूमिका घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनात शिवेसना आमदारांची बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेचे आमदार संतप्त झाले. शिवसेना मंत्री आणि आमदार साताऱ्यातील गैरप्रकाराविरोधात आक्रमक झाले. उपमुख्यमंत्रींनीही घडलेल्या प्रकाराबाबत नाराजी बोलून दाखवली. सत्ताधारी मंत्री आणि आमदारांना मिळणारी दुय्यम वागणूक न खपणारीच असल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर आम्ही राजीनामा देऊ अशी भूमिका शिवसेना मंत्र्यांने एकनाथ शिंदेच्या समोर बोलून दाखवली. सातत्याने आमची गळचेपी होत आहे यावर बोललं पाहिजे असं आमदार आणि मंत्री म्हणाले. त्यावरुन साताऱ्याचे एसपी तुषार दोशी यांना निलंबित करण्याचे आदेश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी भाजप नेते मंत्री जयकुमार गोरे यांची बाजू ऐकून घेतली. यानंतर मग सभागृहाचं कामकाज स्थगित झालं.

मुख्यमंत्र्यांच्या दालनात भाजपची, तर शिंदेंच्या दालनात शिवसेना मंत्र्यांची बैठक

दरम्यान, अधिवेशनात सातारा निवडणुकीचे पडसाद उमटल्यानंतर भाजपचे आमदार आणि मंत्र्यांची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात झाली. तर तिकडे एकनाथ शिंदे यांच्या दालनात शिवसेनेच्या आमदारांनी आक्रमक भूमिका मांडली. 

कुठेही तडजोड नाही - भाजप

तिकडे शिवसेना आक्रमक झाली असताना, भाजपनेही तशीच भूमिका घेतली आहे. सातारा निवडणुकीबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा पवित्रा भाजपने घेतला. 

सातारा SP निलंबित 

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये झालेल्या अभूतपूर्व राड्यानंतर विधान परिषद सभापती नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दाखल घेतली आहे. नीलम गोऱ्हे यांनी सातारा पोलीस अधीक्षकांचे निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात पुण्याच्या विभागीय आयुक्तांना लक्ष घालून चौकशीचे आदेश दिले आहेत. आज (23 मार्च) विधानपरिषदेमध्ये सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये झालेल्या राड्यावरून शिवसेना नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. सभापतींनी गंभीर दखल घेत सातारा पोलीस अधीक्षकांचे निलंबनाचे आदेश दिले. 

सातारा जिल्हा परिषद एकूण संख्याबळ 65

  • भाजप - 27
  • राष्ट्रवादी - 20
  • शिवसेना - 15
  • काँग्रेस - 1
  • अपक्ष - 2

जिल्हा परिषद निवडीमध्ये फुटलेले सदस्य

राष्ट्रवादी

  • लता करणे - (बुध खटाव)
  • ऋतुजा जगताप - (फलटण)
  • कामेश कांबळे - (सातारा)

पोलिसांनी जिल्हापरिषद परिसरात अपहरणाच्या गुन्ह्याखाली उचलून नेले

  • अनिल देसाई (माण) - राष्ट्रवादी
  • संदीप मांडवे (खटाव) - राष्ट्रवादी

शिवसेना

  • हणमंत जगदाळे (कोरेगाव कुमठे)
  • सारिका फाळके (सतार रोड)

एकूण

  • भाजप - 33
  • शिवसेना /राष्ट्रवादी/स्वाभिमानी/ काँग्रेस - 30

साताऱ्यात नेमकं काय झालं?

  • सातारा जिल्हा परिषदेत शिवसेना-राष्ट्रवादी युतीचे ६५ पैकी ३५ जागा मिळवत बहुमत
  • भाजप २७ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर
  • साताऱ्यात बहुमतासाठी ३३ सदस्यांच्या पाठिंब्याची होती गरज
  • अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने ६ सदस्य फोडत अध्यक्ष बनवला
  • भाजपने शिवसेनेचे २,राष्ट्रवादीचे ३ सदस्य फोडले
  • भाजपने एका अपक्षाचाही पाठिंबा मिळवत अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली
  •  इतर दोन सदस्यांना पोलिसांनी मतदानापासून रोखल्याचा शिवसेनेचा आरोप
  • शिवसेना आमदार महेश शिंदेंच्या पत्नी भाजपकडून अध्यक्षपदी

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.