मृत झालेल्या व्यक्तीला कामावर ठेवून मजुरी दिल्याच माहितीच्या आधारे उघड , धाबा ग्रामपंचायती मधील प्रकार
Marathi March 23, 2026 06:25 PM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बारा वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीला कामावर ठेवून मजुरीही दिलाचा प्रकार माहितीच्या आधारे उघड झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. चंद्रपूर जिल्हातील गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या धाबा ग्रामपंचायत मधील घटना आहे. मृतक ला गावातील कोंडवाड्यातील जनावरांना पाणी, चारा खायला देण्याच काम देण्यात आलं आणि या कामाची ग्रामपंचायतेने मजुरी दिली दिल्याची माहिती समोर आली आहे. हा धक्कादायक आणि अकल्पित प्रकार बघून जिल्हा प्रशासन चक्राविले आहे. धाबा गावातील रहिवाशी विलास चनेकार यांचे निधन सण 2013 मध्ये झाले होते. असे असताना 2024 मध्ये त्यांना ग्रामपंचायतेने मजूर ठरवून त्यांचा नावाने 7200 रुपयाचे देयक काढले आहे. खर्चाच्या पावतीवर वाउचर क्रमांक नाही. स्वाक्षरीचा नावाने केवळ विलास असं लिहिलं आहे. त्यावर निशाणी अंगठा नाही. दरम्यान,चनेकार यांच्या मुलाने 7200 रुपये मिळाले नसल्याचे सांगितले. ग्रामपंचायतेला मिळालेल्या पंधराव्या वित्त आयोगाचा निधीत 80 लाखाचा आर्थिक अपहार झाल्याचा आरोप ग्रामपंचायतेवर होत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.