“या सगळ्याला सरकारही तितकच जबाबदार आहे असं म्हणावं लागेल. ते कसली वाट पाहत होते? कोणाची वाट पाहत होते? तुमचं जर इंटेलिजन्स विरोधकांवर पाळत ठेवण्या इतपत सक्षम आहे. मग अशा अघोरी बाबाच्या जागेत अशी घृणास्पद, क्रूर कृत्य घडत असतील. तुमच्याकडे माहिती होती असं सांगताय, मग तुम्ही का थांबवल नाहीत? तुम्ही अनेक वर्ष मुख्यमंत्री आहात. त्या आधी उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री होता. तरीही ही माहिती आपल्याकडे आलेली असताना आपण एका महिलेच्या तक्रारीची वाट पाहत बसला. मला वाटतं हे चुकीचं आहे” अशा शब्दात संजय राऊत यांनी अशोक खरात प्रकरणात सरकारवर टीका केली.
“नाशिकसोडून द्या. ती नाशिकमध्ये पोलिसांनी फॅशन झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्र कायद्याचा बालेकिल्ला आहे का?. नाशिक खरोखर कायद्याचा बालेकिल्ला असता तर खरात सारखी प्रकरणं निर्माणच झाली नसती. बीडमध्ये कोण आहे हे सगळे भाजपचे हस्तक आहेत. कॅप्टन खरात हा भाजपचा प्रचारक होता. त्याचा निवडणुकांमध्ये प्रचारासाठी वापर करुन घेतला” असा आरोप संजय राऊत यांनी केला.
भाजप त्यांना सहकार्य करत होता
“बच्चू कडू त्याला भेटले. बच्चू कडूंना ते आशीर्वाद देतायत भाजपच्या मंत्रिमंडळातले मंत्री बनून भेटायला या.ते असं नाही म्हणाले काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीचे मंत्री बनून या. भाजपचेच मंत्री बनून या तुम्ही इथे या असं म्हणाले. याचा अर्थ त्यांना भाजप विषयी सहानुभूती होती. भाजप त्यांना सहकार्य करत होता” असा आरोप संजय राऊत यांनी केला.
महिलांचे फोटो कसे बाहेर येत आहेत
अशोक खरात प्रकरणात महिलांचे फोटो बाहेर येत आहेत, त्यावर सुद्धा राऊत बोलले. “आतापर्यंत असं कधी झालं नव्हतं की कुठल्याही महिलांचे फोटो, चित्र त्यांची ओळख गुप्त ठेवली जायची. प्रथमच महाराष्ट्रात हे होत आहे. जप्त केलेले मोबाइल पोलिसांकडे आहेत. पोलीस गृहखात्याच्या नियंत्रणाखाली आहेत. गृहखातं भाजपकडे आहे. याआधी महिलांचे फोटो उघडपणे आले नव्हते. पण नाशिकमध्ये प्रथमच त्या महिलांचे फोटो येत आहेत. याची सरकारला लाज वाटली पाहिजे. तेजस्वी सातपुते तपासाच्या प्रमुख आहेत. त्यांनी चौकशी केली पाहिजे. महिलांचे फोटो कसे बाहेर येत आहेत?” असं राऊत म्हणाले.