भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. अशोक खरात याला परदेशात पलायन करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी अटक केल्यामुळे त्याचा पळून जाण्याचा डाव उधळला होता. मात्र आता अशोक खरात याची पत्नी, दोन मुली आणि मुलगा हे परदेशात जाण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. Ashok Kharat Case Family Travel Plans Raise Questions On Wife Awareness
दरम्यान, पोलिस आणि आयकर विभागाने केलेल्या प्राथमिक तपासात अशोक खरात आणि त्याच्या पत्नीच्या नावावर कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे. या संपत्तीमध्ये रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने तसेच विविध ठिकाणी असलेल्या जमिनी आणि फ्लॅट्सचा समावेश आहे.
खरातचा पत्रकाराच्या हत्येशी संबंध असल्याचा आव्हाडांचा दावा, २ आरोपींचा मृत्यू; आरोपींच्या काकांनी दावे फेटाळलेविशेष म्हणजे, अशोक खरात याच्या पत्नीने यापूर्वी “माझा पती ना ज्योतिषी आहे ना कोणताही व्यवसाय करतो,” असे सांगितले होते. त्यामुळे कोणताही स्पष्ट उत्पन्नाचा स्रोत नसताना एवढी मोठी मालमत्ता कशी उभी राहिली, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कोट्यवधींचे व्यवहार झालेले असूनही पत्नीला त्याची कल्पना नसल्याचा दावा संशयास्पद मानला जात आहे.
अशोक खरात याच्या पत्नीची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. सध्या पोलिसांसोबत आयकर विभागानेही या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आर्थिक व्यवहारांचा छडा लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणातील सर्व गुन्हे SIT कडे वर्ग करण्यात आले आहेत. एकूण सात गुन्हे दाखल झाले आहेत. यापुढे अशोक खरात प्रकरणाचा सर्व तपास SIT करणार आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात सात महिलांनी खरात विरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
भोंदू अशोक खरातची आजची SIT चौकशी संपली संपली आहे. दिवसभर सखोल चौकशीनंतर तपास पथकाकडून विचारपूस पूर्ण झालीय. विविध मुद्द्यांवर खरातची चौकशी केली गेली. पुढील चौकशीसाठी नेटवर्कमधील पुन्हा इतरांनाही समन्सची शक्यता आहे. SIT तपासातून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.