मध्य पूर्वेत अमेरिका-इराणमध्ये सुरु असलेल्या युद्धाला 26 दिवस झाले आहेत. या युद्धाचा ज्वर कमी होण्याऐवजी उलट दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. इराण युद्धासंदर्भात व्हाइट हाऊसच्या सचिव कॅरोलिन लेविट यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. इराण हे युद्ध हरतोय आणि त्यांची 9 हजारपेक्षा जास्त ठिकाणं अमेरिकी हल्ल्यात नष्ट झाली आहेत. तेच अमेरिकी राष्ट्र्ध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलय की, इराणी नेत्यांना डील करायची आहे. पण ते मोकळेपणाने बोलायला घाबरतायत. आम्ही त्यांना मारुन टाकू ही त्यांच्या मनात भिती आहे. कॅरोलिन लेविट म्हणाल्या की, “इराणमध्ये अमेरिकेची कारवाई सुरु आहे. अमेरिकेने आतापर्यंत इराणवर 5 हजार पाऊंडचे बॉम्ब टाकले आहेत. युद्ध कधीपर्यंत चालणार? या प्रश्नावर कॅरोलविना यांनी मिशन पूर्ण व्हायला अजून 4 ते 6 आठवड्यांचा कालावधी लागेल” असं म्हटलं आहे.
राष्ट्रपती ट्रम्प यांनी इराणला पुन्हा धमकी दिली आहे. “इराणने पराभव मान्य केला नाही तर अजून भीषण प्रहार होईल. आम्ही आतापर्यंत 8 युद्ध जिंकली आहेत. लोक अनेकदा हे विसरतात. आम्ही अजून एक युद्ध जिंकतोय. इराण शांतता करार करण्यासाठी आतुर आहे. पण त्यांना हे मान्य करायचं नाहीय. इराणला भिती ही आहे की, अमेरिका संपवून टाकेल. इराणने आम्हाला कमी लेखण्याची चूक करु नये. इराणी नेतृत्वाचा आधीच पराभव झाला आहे” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. इराणने मात्र ट्रम्प यांचे हे दावे फेटाळून लावले आहेत. युद्धासाठी आम्ही तयार आहोत असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी सीजफायर आणि ट्रम्प यांच्या चर्चेच्या दाव्यांना फोल ठरवलं.
नेमकं खरं कोण बोलतय?
“राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि आमच्या सैन्याच्या अंदाजानुसार हे महत्वाचं मिशन पूर्ण करण्यासाठी 4 ते 6 आठवडे लागतील असा आमचा अंदाज होता. 25 दिवस झाले असून जगातील शक्तीशाली सैन्य आपल्या निर्धारिक वेळेपेक्षा पुढे चाललं आहे. इराणच्या सत्तेला आता युद्धातून बाहेर पडायचं आहे. त्यासाठी ते मार्ग शोधतायत. त्यांना कळून चुकलय की ते मार खातायत. अमेरिका आणि मित्र सैन्यावर हल्ला करण्याची त्यांची क्षमता आणि आपल्या क्षेत्राच संरक्षण करण्याची त्यांची क्षमता प्रत्येक तासागणिक कमी होत चालली आहे” असं व्हाइट हाऊसच्या अधिकारी कॅरोलिन लेविट म्हणाल्या. ट्रम्प म्हणतोय इराण चर्चा करतोय. इराण हा दावा नाकारतोय. त्यामुळे नेमकं खरं कोण बोलतय हा प्रश्न निर्माण होतो.